कोरोनासंदर्भातील हेल्पलाईन ठरतेय नागरिकांची डोकेदुखीच

डॉक्टरांच्या मार्गदर्शनासह रुग्णालयांमधील खाटांची उपलब्धता तसेच रुग्णवाहिकेची सुविधा आदींसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून संपर्क केला जात असला तरी प्रत्यक्षात जनतेच्या पदरी निराशाच पडत आहे.

Mumbai

कोरोना कोविड-१९च्या संदर्भातील तक्रारी तसेच सेवा सुविधांची माहिती देण्यासाठी महापालिकेने १९१६ ची हेल्पलाईन मागील २४ एप्रिलपासून खुली करून दिली. परंतु यावरून डॉक्टरांच्या मार्गदर्शनासह रुग्णालयांमधील खाटांची उपलब्धता तसेच रुग्णवाहिकेची सुविधा आदींसाठी मोठ्या प्रमाणात नागरिकांकडून संपर्क केला जात असला तरी प्रत्यक्षात जनतेच्या पदरी निराशाच पडत आहे. दिवसाला सुमारे या हेल्पलाईनवर सुमारे ४ हजार दूरध्वनी येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला तरी प्रत्यक्षात ही हेल्पलाईन कायमच व्यस्त असून नागरिकांना आवश्यक असलेल्या रुग्णालयातील खाटांची उपलब्धता आणि रुग्णवाहिकांची सुविधांचे निरसन करण्यात निष्क्रीय ठरल्याचे दिसून येत आहे.

मुंबई महापालिकेच्या आपत्कालिन विभागाच्यावतीने कोविड १९साठी १९१६ची दूरध्वनी सेवा रुग्णांसाठी असलेल्या निरनिराळ्या सेवा सुविधांची माहिती देणे आणि त्यांच्या तक्रारींचे निरसन करून नागरिकांना मार्गदर्शन  करण्यासाठी सुरु केली. २४ एप्रिलपासून सुरु केलेल्या या हेल्पलाइनवर दररोजन ४ हजार दुरध्वनी संभाषण कार्यक्षमतेने हाताळले जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. आजवर या मदत सेवेवर ६८ हजार ४०७ दुरध्वनी आल्याची माहिती महापालिकेच्या आपत्कालिन विभागाने दिली आहेङ. आपत्कालिन विभागाचे प्रमुख महेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेल्या या हेल्पलाईनच्या कामांसाठी ३ सत्रांत ४८ कर्मचारी व अधिकाऱ्यांची फौज आहे. परंतु प्रत्यक्षात नागरिकांचे  या हेल्पलाईनबाबत वाईट अनुभव आहेत. मुळात ही हेल्पलाईन सतत व्यस्त असते आणि योग्यप्रकारे मार्गदर्शन केलेच जात नाही. विशेषत: रुग्णालयांमधील खाटांच्या उपलब्धतेबाबत आणि रुग्णवाहिका सेवांबाबत  तर लोकांचे फारच कटू अनुभव आहेत.  हेल्पलाईनवर नागरिक संपर्क तर करताच परंतु आजवर या हेल्पलाईनवर रुग्णाला खाट किंवा रुग्णवाहिका उपलब्ध झाली अशी प्रकरणे अपवादात्मक आहे. जो अनुभव नागरिकांना आहे, तोच अनुभव विभागीय सहायक आयुक्त तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांना आहे. कोणतीही ऑनलाईन प्रणाली उपलब्ध नाही, ज्याद्वारे या नियंत्रण कक्षातून एका क्लिकवर कुठे खाट रिकाती आहे किंवा कुठली रुग्णवाहिका उपलब्ध होवू शकेल आणि  किती वेळात रुग्णापर्यंत पोहोचेल याची ठोस माहिती कर्मचाऱ्यांना देता येत नाही. केवळ टेलिफोन ऑपरेटर म्हणूनच याचा उपयोग होत असून या हेल्पलाईनद्वारे एकप्रकारे नागरिकांना मनस्तापच अधिक होवू लागला आहे. मुंबईतील नगरसेवकांनीही याबाबती तीव्र नाराजी व्यक्त करत सुविधेपेक्षा असुविधाच जास्त असल्याचे त्यांनी सांगितले. हेल्पलाईनवर अवलंबून असल्याने दुसरी यंत्रणा आम्ही राबवत नाही किवा प्रयत्न करत नाही.परिणामी  यावर विसंबून राहिल्याने बऱ्याचदा रुग्णांचे हाल आणि नुकसानच होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नियंत्रण कक्षात कुठल्या कामांसाठी किती दूरध्वनी

डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला :  १४ हजरी २५३

रुग्णवाहिकेच्या सोयीसाठी :  ११ हजार ३३३

रुगालयातील खाटांची उपलब्धता व व्यवस्थेसाठी: २१ हजार ३०९

आहार, अन्यधान्य, प्रवास आदीसाठी : २५ हजार ५३९

महापालिकेची १९१६ ही हेल्पलाईन पूर्णपणे निष्क्रीय आहे. तीन दिवसांपूर्वी या हेल्पलाईनवर फोन करून ऑक्सिजनच्या रुग्णवाहिकेची मागणी केली. माझा अधिकृत तक्रार क्रमांक ६६१६ असा होता. परंतु या हेल्पलाईनवर माझा फोन तब्बल पाऊण तास होल्डवर ठेवून तेथील कर्मचारी गावाकडच्या गप्पा मारत बसले. शेवटी मीच कंटाळून फोन ठेवला. एका लोकप्रतिनिधीचा पाऊण तास फोन होल्डवर ठेवूनही त्यांनी शेवटपर्यंत रुग्णवाहिका मिळाली नाही. अखेर त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर अजुनही असेच अनुभव आहे. १९१६ ही केवळ नावापरुती हेल्पलाईन असून त्यावर कधीही संपर्क होत नाही झाला तरी रुग्णालयात खाट उपलब्ध होत नाही की रुग्णवाहिका उपलब्ध होत नाही. प्रशासन अमुक दूरध्वनी येत असल्याचा दावा करत आहे, परंतु प्रत्यक्षात किती नागरिकांना सुविधा दिली हेही त्यांना सांगावे. – आशा मराठे, अध्यक्षा, एम-पश्चिम प्रभाग समिती 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here