Coronavirus – गुडन्यूज! करोनाबाधीत १५ रुग्णांना घरी सोडले!

Mumbai
kasturba hospital
करोना रुग्णावर उपचार करणारे मुंबईतली कस्तुरबा रुग्णालय

करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यासाठी महत्वाची आणि चांगली बातमी आहे. महाराष्ट्रातील करोनाबाधीत १५ रुग्णांना हाॅस्पिटलमधुन डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ही माहिती दिली आहे. राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १२४ झाली आहे. मुंबईत एक आणि ठाणे येथे एक रुग्ण आढळून आला आहे. नवी मुंबई आणि ठाण्यात प्रत्येकी एक रुग्ण आढळल्याने करोनाग्रस्तांची संख्या १२४ वर पोहचली आहे. बुधवारपर्यंतही रुग्णसंख्या १२२ होती. आता दोन नवे रुग्ण आढळल्याने ही संख्या १२४ वर गेली आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करुन ही माहिती दिली.

शिवाय, बुधवारी पुण्यात दोघा करोनाबधित रुग्णांना घरी सोडण्यात आले. तत्पूर्वी मुंबई आणि औरंगाबाद येथील रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. करोनाबाबत ही जरी सकारात्मक बाजू असली तरी राज्यात करोना पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे.आतापर्यंत १२४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. शिवाय ४ जणांच्या मृत्युंची नोंद करण्यात आली आहे.

करोनाचा फैलाव थांबवण्यासाठी राज्य सरकारने महाराष्ट्रात संचारबंदी लागू केली आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाउन जाहीर केला आहे. या कालावधीत कुणीही गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नये असं आवाहन करण्यात आलं आहे. जीवनावश्यक वस्तू, आरोग्यसेवा, अत्यावश्यक सेवा या सगळ्या संचारबंदी आणि लॉकडाउनमधून वगळण्यात आल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here