Coronavirus Mumbai : मुंबईमध्ये कोरोनाचे १५६६ नवे रुग्ण, आज ४० मृत्यू

Mumbai
corona cases found in mumbai today

राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत असताना मुंबईत देखील कोरोनाच्या रुग्णवाढीचा वेग कायम आहे. आज दिवसभरात मुंबईत एकूण १५६६ नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे एकट्या मुंबत कोरोनाग्रस्तांचा आकडा २८ हजार ६३४ झाला आहे. मुंबईत आज ४० रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे मुंबईतल्या मृतांचा आकडा देखील वाढून ९४९ झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईतला कोरोनाचा कहर अजूनही निवळला नसल्याचंच या आकडेवारीवरून दिसून येत आहे. दिवसभरात आज ३९६ कोरोनाग्रस्त रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बऱ्या झालेल्या रुग्णांचा आकडा काहीसा वाढून ७ हजार ४७६ झाला आहे.

mumbai corona cases letter

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here