CoronaVirus – सरकारच्या मदतीसाठी मुंबई विद्यापीठही सरसावले!

Mumbai
Mumabi University
मुंबई विद्यापीठ

देशावर कनोराचं संकट आलं आहे. या संकटातून बाहेर पडण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. सरकराने संपूर्ण देशात लॉकडाऊन जाहीर केला आहे. सरकार करत असलेल्या प्रयत्नांना साथ देण्यासाठी विविध संस्था पुढे आल्या आहेत. यात आता मुंबई विद्यापीठानेही पुढाकार घेतला आहे. विद्यापीठ करोनासाठी लागणारं सहकार्य करेल असे पत्र मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहले आहे.

मुंबई विद्यापीठातील वसतीगृहे तसेच इतर काही इमारतींचा वापर विलगीकरण किंवा अन्य कारणासाठी करता येऊ शकेल. यासाठी विद्यापीठ परिपूर्ण सहकार्य करले असे या पत्रात लिहीले आहे. करोनाचा प्रादुर्भात झालेल्यांची मुंबईतील गुरुवारी आत्तापर्यंतची सर्वाधिक नोंदविली गेली आहे. या पार्श्वभूमीवर सरकारी यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत.

आता मुंबई विद्यापीठानेही मदतीचा हात पुढे केला आहे. सरकारला विविध स्तरावरून मदतीचे हात येऊ लागले आहे. यात मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पेडणेकर यांनीही सरकारला विद्यापीठ स्तरावरून आवश्यक ती मदत करण्याची तयारी दर्शविली आहे.


हे ही वाचा – शरद पवार आज साधणार फेसबुकवरून जनतेशी संवाद


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here