घरताज्या घडामोडी'मातोश्री'त कोरोनाचा शिरकाव; ठाकरे कुटुंबाला काळजी घेण्याचा सल्ला

‘मातोश्री’त कोरोनाचा शिरकाव; ठाकरे कुटुंबाला काळजी घेण्याचा सल्ला

Subscribe

कोरोनाने आता 'मातोश्री'मध्ये प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या खासगी निवासस्थाना बाहेरील चहावाला आणि सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र, आता या कोरोनाने ‘मातोश्री’मध्ये प्रवेश केला आहे. ‘मिडडे’ने दिलेल्या वृत्तानुसार, मातोश्रीवरील कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, ठाकरे कुटुंब सुखरुप असले तरी देखील काळजी घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

ठाकरे कुटुंब सुखरुप

मातोश्रीवर पाळीव कुत्र्याचा सांभाळ करणाऱ्या कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन झाले आहे. या कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी केली असता त्याचा रिपोर्ट पॉझिट्व्ह आला. त्यानंतर संपूर्ण मातोश्री बंगला सॅनिटाईज करण्यात आला आहे. तसेच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबातील अन्य सदस्य या कर्मचाऱ्याच्या थेट संपर्कात आले नाही, असे देखील सांगण्यात येत आहे. मात्र, ठाकरे कुटुंबाला आवश्यक ती खबरदारी घेण्यास सांगितली आहे.

- Advertisement -

राज्यात ७२ हजार ३०० कोरोनाबाधित

देशात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असून सर्वात जास्त कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्र राज्यात आहे. सध्या कोरोनाबाधितांचा आकडा ७२ हजार ३०० झाला आहे. त्यातील ३१ हजरा ३३३ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात आतापर्यंत २ हजार ४६५ जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्राखालोखाल महत्वाची टॉप ७ राज्य

  • तामिळनाडू : २४५८६ रुग्ण, १३७०६ बरे झाले, असून मृतांचा आकडा १९७
  • दिल्ली : २२१३२ रुग्ण, ९२४३ बरे झाले असून मृतांचा आकडा ५५६
  • गुजरात : १७६१७ रुग्ण, ११८९४ बरे झाले असून मृतांचा आकडा १०९२
  • राजस्थान : ९३७३ रुग्ण, ६४३५ बरे झाले असून मृतांचा आकडा २०३
  • मध्यप्रदेश : ८४२० रुग्ण, ५२२१ बरे झाले असून मृतांचा आकडा ३६४
  • उत्तरप्रदेश : ८३६१ रुग्ण, ५०३० बरे झाले असून मृतांचा आकडा २२२
  • पश्चिम बंगाल : ६१६८ रुग्ण, २४१० बरे झाले असून मृतांचा आकडा ३३५

    हेही वाचा – देशात २४ तासांत ८,९०९ नवे रुग्ण; २१७ जणांचा मृत्यू


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -