Saturday, August 8, 2020
Mumbai
27 C
घर महामुंबई धारावी पॅटर्नचे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर कौतुक

धारावी पॅटर्नचे पुन्हा एकदा जागतिक स्तरावर कौतुक

वॉशिंग्टन पोस्टकडून धारावी पॅटर्नचं कौतुक

Mumbai
dharavi

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबई महापालिकेची झोप उडाली होती. मात्र, मुंबई महापालिकेने कौतुकास्पद कामगिरी करत धारावीतील कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणला. त्यामुळे आता कोरोनाला रोखण्यासाठी वापरण्यात आलेल्या धारावी पॅटर्नचं जागतिक स्तरावर कौतुक होत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने याआधी धारावी मॉडेलची स्तुती केली होती. त्यानंतर आता वॉशिंग्टन पोस्टनेही धारावीमधील मुंबई पालिकेच्या कामगिरीची दखल घेतली आहे.

धारावीतील परिस्थिती नियंत्रणात आणण्यात मुंबई पालिकेला यश आलं. मुंबई पालिकेच्या या कामगिरीबद्दल जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित वृतपत्र असलेल्या वॉशिंग्टन पोस्टने प्रशंसा केली आहे. याआधी त्यांनी मुंबईसहित इतर महत्त्वाच्या शहरांमधील कोरोनाची माहिती देण्यासाठी दाखवलेल्या पारदर्शकतेबद्दल कौतुक केलं होतं. दरम्यान, पुन्हा एकदा धारावी पॅटर्नचं कौतुक करण्यात आलं आहे.

वॉशिंग्टन पोस्टने शुक्रवारी ३१ जुलै रोजी धारावी पॅटर्नवर आधारित एक लेख प्रसिद्ध केला. ‘How a packed slum in Mumbai beat back the coronavirus, as India’s cases continue to soar’ हा लेख प्रसिद्ध करत धारावी पॅटर्नचं कौतुक केलं. धारावीमधील कोरोनाविरोधातील लढा घनदाट वस्ती असणाऱ्या अनेक शेजारी तसंच खास करुन विकसित देशांसाठी महत्त्वाचा धडा असल्याचं या लेखात म्हटलं आहे. “डोक्यावर कोरोनाचं संकट असताना धारावीमध्ये केलेले उपाय, तिथल्या समुदायाचा सहभाग आणि चिकाटी हे दखलपात्र आहे,” असं वॉशिंग्टन पोस्टने म्हटलं आहे.

गेल्या महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेकडून धारावी मॉडेलचं कौतुक करण्यात आलं होतं. WHO चे प्रमुख टेड्रोस एडहानोम गेब्रेयेसुस यांनी मुंबईतील म्हटलं होतं की, “केवळ राष्ट्रीय एकात्मता आणि जागतिक ऐक्यातून या साथीला प्रतिबंध केला जाऊ शकतो. जगात अशी अनेक उदाहरणे आहेत की महामारी अत्यंत गंभीर अवस्थेत असली तरीही ती पुन्हा नियंत्रित केली जाऊ शकते. इटली, स्पेन, दक्षिण कोरिया आणि धारावी (मुंबई) जो जास्त लोकसंख्या असलेला भाग आहे ही याची काही उदाहरणं आहेत. सर्वांना सामील करणं, चाचणी करणे, रुग्णांचा शोध घेणं, त्यांचं अलगीकरण करणं हे संसर्गाची साखळी तोडण्यासाठी आणि करोनावर विजय मिळवण्यासाठी महत्त्वाचं आहे.”

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here