शीव हॉस्पिटलच्या डॉक्टर-कर्मचाऱ्यांना करोनाचे प्रशिक्षण

शीव हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना करोना व्हायरसशी सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनऔषध वैद्यक शास्त्र या विभागातर्फे हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.

coronavirus training to doctors and staff of sion hospital
शीव हॉस्पिटलच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना करोना व्हायरसशी सामना करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनऔषध वैद्यक शास्त्र या विभागातर्फे हा विशेष उपक्रम राबवण्यात आला.

मुंबईतही करोनाचे दोन पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर खबरदारी म्हणून पालिका हॉस्पिटलमधील डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांनाही करोनाबाबतचे प्रशिक्षण दिलं जात आहे. पालिकेच्या लोकमान्य टिळक हॉस्पिटल म्हणजेच शीव हॉस्पिटलमध्ये जनऔषध वैद्यक शास्त्र या विभागातर्फे हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या प्रत्येकासाठी करोनाबाबतचे प्रशिक्षण ठेवण्यात आलं होतं. हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांच्या उपस्थितीखाली हे प्रशिक्षण देण्यात आलं आहे. यात करोना या आजाराबाबत सर्व माहिती देण्यात आली आहे. शिवाय, क्लिनिकल मॅनेजमेंट, लॅबमधील निदान, प्रतिबंधात्मक उपचार आणि नियंत्रण याबद्दल संपूर्ण माहिती देण्यात आली.

जनजागृती करण्याच्या उद्देशातून प्रशिक्षण

या प्रशिक्षणात प्राध्यापक, निवासी वैद्यकीय अधिकारी, शिकाऊ डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, हाऊस ऑफिसर, पॅरामेडिकल कर्मचारी, नर्सेस आणि प्रशासकीय कर्माचाऱ्यांचा समावेश होता. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णांना हाताळणाऱ्या प्रत्येकाला कॉवीड १९ करोनाची लक्षणे आणि त्यांच्यावर कशापद्धतीने उपचार केले जातील याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशातून हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आलं असल्याचं हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी यांनी सांगितलं.