घरमुंबईनगरसेवकाला २४ लाखांचा भुर्दंड; पालिकेनी केली कारवाई

नगरसेवकाला २४ लाखांचा भुर्दंड; पालिकेनी केली कारवाई

Subscribe

मुंबई महानगरपालिकेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्याच वॉर्डमध्ये बेकायदेशीर होर्डिंग लावल्यास आता खुद्द नगरसेवकाला २४ लाखांचा भुर्दंड भरावा लागणार आहे. अंधेरी येथील भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांना या निर्णयाचा फटका बसला आहे.

मुंबई महानगरपालिकेकडून एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्याच वॉर्डमध्ये बेकायदेशीर होर्डिंग लावल्यास आता खुद्द नगरसेवकाला २४ लाखांचा भुर्दंड भरावा लागणार आहे. अंधेरी येथील भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांनी कारवाई करण्यास आलेल्या पालिका अधिकाऱ्याला मारहाण केली होती. मात्र, हे प्रकरण नगरसेवक यांना खूप महागात पडले आहे.

अनोखी दिली शिक्षा

दरम्यान, अंधेरे येथील भाजप नगरसेवक मुरजी पटेल यांनी या घटनेची संपूर्ण जवाबदारी स्वीकारली आहे. तसेच त्यांनी आपला माफीनामा सुद्धा सादर केला आहे. यापुढे कुठेही बेकायकेशीर होर्डिंग लावणार नाही, अशी हमीही त्यांनी हायकोर्टला दिली आहे. तसेच पटेल यांना एक दिवस आपल्या वॉर्डमधील शाळा, मैदान, हॉस्पिटल येथील परिसरात लावलेले बेकादेशीर होर्डिंग शोधून त्या होर्डिंगची रितसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करावी लागणार आहे. त्यानंतर दोन महिन्यांनी पालिकेला त्यांनी केलेली नुकसान भरपाई आणि किती तक्ररींची नोंद झाली याची माहिती द्यावी लागणार आहे.

- Advertisement -

नेमक प्रकरण काय?

पालिकेच्या वेवसाईटमार्फत भाजप नगरसेवक मुरजी पटेल आणि केसरबेन मुरजी पटेल यांच्या जीवनज्योती फाऊंडेशनतर्फे अंधेरी पालिका मैदानाबाहेर, फुटपाथवर बेकायदेशी होर्डिंग आणि बॅनस लावले आसल्याची तक्रर मिळाली होती. या घटनेची खातरजमा केल्यानंतर ‘के वार्ड’मधील लायसन्स इन्स्पेक्टर उत्तम सरवदे त्यांच्या सहकाऱ्यांसोबत कारवाईसाठी गेले असता. तिथे भाजप कार्यकर्ते राजू सरोज, विशाल निचिते, प्रकाश मुसळे, महेश शिंदे, नरेल शेलार आदी कार्यकर्त्यांनी प्रचंड शिवीगाळ तसेच कर्मचाऱ्यांना मारहाण सुद्धा केली. महापालिकेने हायकोर्टाला त्यांच्या अवमान याचिकेतून हा प्रकरण समोर आला आहे. यासंबंधीत पालिकेने पुरावेही सादर केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -