लाचखोर अधिकारी पुन्हा केडीएमसीच्या सेवेत

महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांपासून ते शिपायांपर्यंतचे अधिकारी कर्मचारीपर्यंत तब्बल ३१ अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीत अडकले आहेत.

Mumbai
kdmc mahasabha organized at atre rangmandir
केडीएमसी

लाचखोरी आणि भ्रष्टाचाराने कल्याण डोंबिवली महापालिकेची बदनामी झाली आहे. महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांपासून ते शिपायांपर्यंतचे अधिकारी कर्मचारीपर्यंत तब्बल ३१ अधिकारी आणि कर्मचारी लाचखोरीत अडकले आहेत. मात्र, गेल्या पाच वर्षात २३ लाचखोरांना पुन्हा महापालिकेच्या सेवेत सामावून घेण्यात आले आहे. निलंबन समितीच्या शिफारशीनुसार त्यांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेत लाचखोरांचेही ‘मी पुन्हा परत येणार’…असाच प्रत्यय दिसून येत आहे.

महापालिकेत आजपर्यंत ३१ अधिकारी कर्मचारी हे लाचखोरीच्या जाळयात अडकले आहेत. पालिकेतील लाचखोर अधिकारी आणि कर्मचाऱ्यामुळे कल्याण डोंबिवलीचे नाव बदनाम होत आहे. मात्र, हेच लाचखोर पुन्हा मोठ्या तोऱ्यात महापालिकेच्या सेवेत दाखल होतात. २०१४ ते २०१९ पर्यंत २३ लाचखोरांना सेवेत सामावून घेण्यात आले आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नगरसेवक विश्वनाथ राणे पालिकेने दिलेल्या माहितीतून ही माहिती उजेडात आली आहे. यंदाच्या वर्षी दोन वेळा निलंबन समितीची बैठक पार पडली एका बैठकीत २ तर दुसऱ्या बैठकीत १० अशा एकूण १३ लाचखोरांना सेवेत सामावून घेतले आहे. मात्र, लाचखोरांकडे पालिकेतील महत्वाची खाती दिली आहेत. निलंबन समितीकडून लाचखोरांना सेवेत सामावून घेतले जात असले तरी सुध्दा पालिकेची महासभा ही सर्वोच्च सभा असते त्या सभेत ही हे प्रस्ताव मंजुरीसाठी येत असतात. त्यावेळी या प्रस्तावांना सत्ताधाऱ्यांकडून विरोध केला जाऊ शकत. मात्र, त्यावेळी विरोध का केला जात नाही, असाही प्रश्न यानिमित्त उपस्थित होतो. लाचखोरांना सेवेत सामावून घेताना त्यांना अकार्यकारी पदावर नेमणूक करण्यात येते. मात्र, लाचखोरांना क्रीम पोस्टवर नेमणूक केली जाते. पालिकेत अपुरा अधिकारी असल्याचे कारण पालिका प्रशासनाकडून सांगितलं जातं.

काय आहे निलंबन समितीचे अधिकार

लाचखोरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांना सेवेतून निलंबीत करण्यात येते. मात्र, शासन निर्णय १४ ऑक्टोबर २०११ च्या तरतुदीनुसार निलंबन आढावा समितीच्या शिफारशीनुसार निंबलन संपुष्टात आणून त्यांना सेवेत अकार्यकारी पदावर घेण्याची तरतूद आहे.

अवघे ३ कार्यकारी अभियंते

महापालिकेत कार्यकारी अभियंत्यांची ११ पदे मंजूर आहेत. कार्यकारी अभियंत्यांच्या सेवानिवृत्तीमुळे आता ३ कार्यकारी अभियंते कार्यरत आहेत. त्यांच्यावर विकास कामांचा भार पडत आहे. त्यामुळे अकार्यकारी पदावर नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांना नियुक्ती दिली जात आहे.

दहा प्रभाग क्षेत्र ४ अधिकारी

महापालिकेत प्रभाग क्षेत्र अधिकाऱ्याची ८ पदे मंजूर असून अवघे ४ पदे कार्यरत आहेत. दहा प्रभागक्षेत्र अशी प्रशासकी यंत्रणा आहे. त्यामुळे अकार्यकारी पदावर नियुक्ती केलेल्या अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात येत आहे.

हे लाचखोर अधिकारी पून्हा सेवेत