घरमुंबईहिवाळ्यात वाढतोय सर्दी, खोकला

हिवाळ्यात वाढतोय सर्दी, खोकला

Subscribe

थंडीची सुरुवात झाल्यानंतर विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता वाढते. श्वसनमार्गाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी असलेल्या व्यक्तींना हा बदल मानवत नाही, याकडे वैद्यकीय तज्ज्ञ लक्ष वेधतात.

हिवाळ्यातील वातावरण बदलामुळे मुंबईकरांना सध्या सर्दी, खोकल्याचा त्रास सतावतो आहे. सकाळी लागणारी थंडी, दुपारी अचानक वाढणारं ऊन आणि पुन्हा संध्याकाळी जाणवणारी थंड हवा यामुळे मुंबईकरांना सर्दीचा त्रास होऊ लागला आहे. नाकातून पाणी येणे, घसा खवखवणं, त्यातून डोकेदुखी आणि श्वसनाचा होणारा त्रास असे आजार मुंबईकरांना होत आहेत. अशा वेगवेगळ्या तक्रारी घेऊन मुंबईच्या पालिकेच्या रुग्णालयासह सरकारी रुग्णालयांमध्ये रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.

रुग्णांचा वाढतोय आकडा

मुंबईतील सरकारी रुग्णालयांपैकी सेंट जॉर्ज या रुग्णालयात थंडी सुरू झाल्यापासून दररोज ८० ते ९० रुग्ण ओपीडीत दाखल होत आहेत. तर पालिकेच्या केईएम, नायर आणि सायन या हॉस्पिटल्समध्येही रुग्णांची वाढती गर्दी दिसून येत आहे.

- Advertisement -

थंडीमध्ये बळावतात आजार

थंडीची सुरुवात झाल्यानंतर विषाणूजन्य आजार होण्याची शक्यता वाढते. श्वसनमार्गाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या तक्रारी असलेल्या व्यक्तींना हा बदल मानवत नाही, याकडे वैद्यकीय तज्ज्ञ लक्ष वेधतात. त्यामुळे अनेकदा दिवाळीनंतर वाढलेल्या प्रदूषणामुळे डॉक्टर्स तोंडाला रुमाल किंवा स्कार्फ बांधून बाहेर फिरण्याचा सल्ला देतात.

डॉक्टरांकडे जा

रोगप्रतिकारशक्ती कमी असलेल्या मुलांना, ज्येष्ठ नागरिक आणि गरोदर महिलांना हा त्रास अधिक जाणवतो. खोकला, सर्दी, घसादुखी झाल्यास त्याकडे दुर्लक्ष करुन नका. घरगुती औषधे आणि इलाज करण्यापेक्षा डॉक्टरांकडे जाणे सगळ्यात योग्य ठरेल, असा सल्ला देखील डॉ. गायकवाड देतात.


हिवाळ्यात खरंतर लोकं बाहेर फिरायला जातात. त्यामुळे त्यांना वातावरणात झालेल्या बदलांचा फरक जाणवतो. शिवाय, आता थंडी सुरू झाली आहे. त्यामुळे, वातावरणात असलेल्या विषाणूंचा आपल्या श्वसनमार्गिकेवर परिणाम जाणवतो. त्यातून सर्दी, दमा किंवा श्वसनाचा त्रास जाणवू शकतो. त्यामुळे, बाहेर जाताना विशेषत: लहान मुलांची काळजी घेतली पाहिजे. बाहेरुन आल्या आल्या लगेचच थंडी पाणी पिणं टाळलं पाहिजे. त्याचा परिणाम आपल्या शरीरावर होतो. हिवाळ्यात मोठ्या प्रमाणात वातावरणात धूळीचे कण जमा होतात. त्याचा ही परिणाम सर्दी, खोकला मग दमा, पडसं असे आजार होतात. ”
– डॉ. मधुकर गायकवाड,वैद्यकीय अधीक्षक, सेंट जॉर्ज रुग्णालय


सर्दी , खोकला किंवा श्वसन विकार असणारे रुग्ण नेहमीच येतात. पण, अनेकदा थंडी सुरू झाली की, रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण कमी होतं. सर्दी, खोकला हा आजार धुळीच्या कणापासून होणारा आहे. त्यामुळे घराबाहेर पडताना विशेष काळजी घेणं महत्त्वाचं आहे. तरी, दिवसाला रोजचे १५० रुग्ण सर्दी , खोकल्याचे असतात.
डॉ. लोकेश चिरवटकर, सायन रुग्णालय

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -