मुंबईतील टॅक्सी चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘कोविड रेडी टॅक्सी’ रस्त्यांवर

मुंबईतील टॅक्सी चालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘कोविड रेडी टॅक्सी’ रस्त्यांवर

मुंबईतील कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर ‘युनायटेड वे मुंबई’ या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेऊन ‘कोविड रेडी टॅक्सी’ राबवण्यात निर्णय घेतला आहे. ‘युनायटेड वे मुंबई’ आणि ‘वडाळा आरटीओ कार्यालय’ या संस्थेने एकत्र येऊन ही संकल्पाना राबवली जाणार आहे. मुंबईतील टॅक्सीचालक आणि प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ‘कोविड रेडी टॅक्सी’ रस्त्यांवर धावणार आहे. संपूर्ण निर्जंतुकीकरण, आयसोलेश स्क्रीन सेटअप तसेच कोविड रेडीनेस किट अशी त्रिसूत्री या संकल्पनेअंतर्गत तयार करण्यात आली आहे.

‘युनायटेड वे मुंबई’चे प्रमुख अजय गोवळे यांनी सांगितले की, ‘पहिल्यांदा या संकल्पेअंतर्गत १५० टॅक्सी कोविड रेडी करण्याचा मानस असून या सर्व टॅक्सीचालकांना विशेष प्रशिक्षण दिले जाणार आहे. तसेच या संकल्पनेमध्ये प्रवाशांसह चालकाच्या सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे.’

या संकल्पनेअंतर्गत रेडीनेस किटमध्ये पुन्हा वापरता येणारा सहा थरांचा फेस मास्क (३), जंतुनाशक स्प्रेस (२ बाटल्या), दीड लिटर हँडपंप स्प्रेस बाटली (१ बाटली), तसेच ५ लीट हँड सॅनिटायझरच कॅन (१ कॅन) देण्यात येणार आहे. शिवाय टॅक्सी साफसफाईसाठी मायक्रो फायबर कपडा आणि हात स्वच्छ धुण्याकरत दहा कागदी साबणाच्या पट्ट्या देण्यात येणार आहेत. टॅक्सी चालकाप्रमाणे प्रवाशांच्या वैयक्तिक सुरक्षेचे नियम लक्षात घेऊन टॅक्सीमध्ये काय करावे आणि काय करू नये, याबाबत माहिती देणारे स्टिकर लावण्यात येणार आहे.


हेही वाचा – Video :हा काय प्रकार आहे? तमिळनाडूत ड्रायव्हरशिवाय चालत होती कार! व्हिडिओ तुफान व्हायरल!