घरCORONA UPDATEचिंताजनक! कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळतोय दुर्मिळ आजार

चिंताजनक! कोरोनातून बरे झालेल्यांमध्ये आढळतोय दुर्मिळ आजार

Subscribe

कोरोनातून बरे होणाचा दर वाढत असला तरी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांमध्ये आता श्वसनाशी संबंधित एक दुर्मीळ आजार आढळत आहे. बरे झालेल्या रुग्णांमध्ये गुलियन बॅरी सिंड्रोम (GBS) हा दुर्मीळ आजार आढळून येत आहे. मुंबईतील कोरोनातून बरी झालेल्या महिलेला लियन बॅरी सिंड्रोम हा आजार असल्याचे निदान झाले होते. कोरोनामुक्त रुग्णाला हा आजार होणे ही दुर्मिळ बाब असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. न्यूरोलॉजिस्ट डॉ. पंकज अग्रवाल यांच्या नेतृत्वाखाली या महिलेवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत.

एका ४९ वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली होती. कोरोनाची सौम्य लक्षणे असल्याने या महिलेवर आणि तिच्या पतीवर घरीच उपचार करण्यात आले. मात्र, तीन आठवड्यानंतर त्यांना पाठदुखीचा त्रास सुरू झाला. ऑर्थोपेडिक सर्जनद्वारे औषधोपचार सुरू असताना काही दिवसांनी चेहऱ्याच्या एका बाजूला पक्षाघात झाला. प्रकृती बिघडत असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कुटुंबीयांनी तिला मुंबईतील खासगी रुग्णालयामध्ये दाखल केले. त्यानंतर महिलेची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. या चाचणी अहवालात महिलेला गुलियन बॅरी सिंड्रोम हा विकार असल्याचे निदान झाले.

- Advertisement -

या आजारामध्ये रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होत असल्यामुळे संसर्गजन्य आजाराची पटकन लागण होते. परंतु, हा आजार रोगप्रतिकारक शक्तीने केलेल्या हल्ल्यामुळे होतो. या आजाराचा विषाणू मज्जातंतू हळूहळू निकामी करून बोट, पाय, हात आणि फुफ्फुसे तसेच श्वसननलिकेवरही हल्ला चढवतो. अशा रुग्णांची अवस्था पक्षाघातासारखी होते. हा आजार कोणत्याही प्रकारच्या विषाणू संसर्गामुळे होऊ शकतो, असे डॉ. अग्रवाल यांनी सांगितले.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -