मिरारोड येथील ग्रीनवुड कॉम्प्लेक्स इमारतीला मोठा तडा गेल्याचे निदर्शनास आले. ही गंभीर बाब लक्षात येताच तातडीने इमारतीतील सर्व रहिवाशांना बाहेर काढण्यात आले. ग्रीनवुड कॉम्प्लेक्समध्ये एकूण ७० कुटुंब वास्तव्याला होती. दरम्यान या सर्व कुटुंबियांना धोकादायक इमारतीतून बाहेर काढण्यात आले असून, त्यांची रवानगी ट्रांझिट कॅम्पमध्ये करण्यात आली आहे. मिरारोडमधील जीसीसी क्लबजवळ ही ग्रीनवुड कॉम्प्लेक्स इमारत असून इमारतील खूप मोठा तडा गेला आहे. सूत्रांनुसार, हा तडा इतका मोठा आहे की कोणत्याही क्षणी इमारत कोसळण्याची भीती वर्तवली जाते आहे. त्यामुळेच सुरक्षिततेच्या दृष्टीने इमारत पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहे. इमारतीतील सर्व रहिवाशांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं असून, त्यांना ट्रांझिट कॅम्पमध्ये हलवण्यात आलं आहे. या कॉम्पलेक्समध्ये एकूण ७० कुटुंबे राहतात.अमिताभ, अमन, माधुरी आणि शाहरुख अशा चार इमारती या कॉम्प्लेक्समध्ये आहेत. इमारतीला तडे गेल्याची माहिती मिळताच अग्निशन दल आणि बचाव पथके तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. इमारतीला तडे गेले असले तरी त्यामध्ये कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान स्थानिकांच्या सांगण्यानुसार, या चारही इमारती काहीशा झुकल्या देखील आहेत.
मिरारोडच्या ग्रीनवुड इमारतीला तडा, रहिवासी सुखरूप
सध्या ग्रीनवूड कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास असलेल्या ७० कुटुंबांची, ट्रान्झिट कॅम्पमध्ये सुरक्षित रवानगी करण्यात आली आहे.
- Advertisement -
- Advertisement -