घरमुंबईदुर्घटनाग्रस्त विमानाच्या दुरुस्तीवर संशय

दुर्घटनाग्रस्त विमानाच्या दुरुस्तीवर संशय

Subscribe

दुर्घटना झालेल्या विमानाचे शेवटचे टेक ऑफ ६ वर्षांपूर्वी झाले होते. गेल्या दीड वर्षापासून या विमानाच्या दुरुस्तीचे काम सुरु होते. या अपघातानंतर विमानाच्या दुरुस्तीवर संशय घेतला जात आहे.

घाटकोपर येथे गुरुवारी दुपारी झालेल्या विमान दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला. तर २ जण जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर आता अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. यासंदर्भात पीडितांच्या कुटुंबियांकडून यूवाय एव्हीएशन कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. तर दुसरीकडे दुर्घटना झालेल्या विमानाचे शेवटचे टेक ऑफ ६ वर्षांपूर्वी झाल्याचे समोर आले आहे. या विमानाच्या दुरुस्तीचे काम काही वर्षापासून सुरु होते. त्यामुळे या अपघातानंतर विमानाच्या दुरुस्तीवर सुद्धा संशय घेतला जात आहे.

विमान नक्की कोणाचे मालकीचे?

अतिशय धक्कादायक माहिती सध्या समोर आली आहे. ती म्हणजे अपघातग्रस्त विमान यूवाय एव्हीएशन या कंपनीच्या मालकीचे जरी असले तरी अद्याप या कंपनीकडून कुठलीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नाही. कंपनीच्या ऑपरेशन विभागाचे हेड अनिल चौहान यासंदर्भात बोलताना म्हटले आहे की, हे विमात उत्तरप्रदेश सरकारकडून विकत घेतल्यानंतर त्याच्या दुरुस्तीचे मोठे काम सध्या सुरू होते. ज्यासाठी याचे कंत्राट इंदामार एव्हीएशन या कंपनीला देण्यात आले होते. या विमानाचे शेवटचे टेक ऑफ ६ वर्षापूर्वी झाले होते.

- Advertisement -

उत्तरप्रदेश सरकारने ३ वेळा लिलावाचा केला प्रयत्न

अपघातग्रस्त विमानाच्या दुरुस्तीचे काम गेल्या दीड वर्षापासून इंदामार एव्हीएशन कंपनी करत होती. हे विमान पूर्णपणे दुरुस्त होऊन यूवाय एव्हीएशन कंपनीला देण्यात आले नव्हते. त्यामुळे विमान उत्तर प्रदेश सरकारकडून विकत घेतल्यानंतरही या विमानावर उत्तर प्रदेश सरकारचा लोगो अजूनही तसाच होता. २०१४ मध्ये या विमानाला अपघात झाल्यानंतर तीन वेळा या विमानाचा लिलाव उत्तर प्रदेश सरकारने करण्याचा प्रयत्न केला गेला. यूवाय एव्हीएशनकडून या २२ वर्ष जुन्या विमानाच्या पार्टसवर ८ कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. पायलट प्रदीप राजपूत आणि को पायलट मारिया जुबेरी हे दोघेही यूवाय एव्हीएशन कंपनीचे कर्मचारी असून दोघांकडे ५००० तासांचा विमान उडविण्याचा प्रदीर्घ अनुभव होता.

मोठा अनर्थ टळला

दरम्यान ज्यावेळी ही घटना घडली. त्यावेळी दुपारी जेवणाची सुट्टी झाली असल्याने बांधकाम जागेवरील बहुतेक कामगार हे जेवणाच्या सुट्टीसाठी बांधकाम कंपाउंडच्या बाहेर गेले होते. तर काही जण बाजूच्या इमारतीत थांबले होते. जेवणासाठी सर्व कामगार बाहेर गेल्यामुळे या ठिकाणी मोठा अनर्थ टळला. पण काम बाकी असल्यामुळे बांधकाम जागेवर लवकुश गौड आणि नरेशकुमार निषाद हे कामगार जागेवरच थांबले होते. या दुर्घटनेत हे दोघे जण जखमी झाले. त्यांच्यावर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

सकाळी विमानाची पूजा आणि दुपारी अपघात

दुर्घटनाग्रस्त विमानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागले आहेत. दुरुस्तीनंतर गुरुवारी या विमानाची ट्रायल रन होती. त्यामुळे सकाळी नारळ फोडून या विमानाची पूजा करण्यात आली. मिठाई सुध्दा वाटण्यात आली होती. विमान उड्डान झाल्यानंतर काही मिनिटातच हे विमान घाटकोपर भागामध्ये कोसळले. या दुर्घटनेमध्ये विमानातील पायलट मार्या झुबेर, कोपायलट प्रदीप राजपुत, इंजिनिअर सुरभी गुप्ता आणि इंजिनिअर मनिष पांडे यांना जीव गमवावा लागला.

मार्याच्या पतीकडून कंपनीवर गंभीर आरोप

विमान दुर्घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या पायलट मार्याचे पती प्रभात कथुरिया यांनी कंपनीवर गंभीर आरोप केले आहेत. उड्डानापूर्वी मारियाचा फोनवरुन पतीशी संवाद झाला होता. यु वाय एव्हीएशन कंपनीने जबरदस्ती उड्डान करायला लावले असल्याचा आरोप त्यांनी केलाय. हवामान खराब असताना देखील कंपनीने विमानाचे उड्डान करण्याचे आदेश दिले. विमानाची चाचणी होणार नाही असं मारियाने फोनवरुन सांगितले होते. चाचणी न झाल्याने मारियाने टेक ऑफसाठी विरोध देखील केला होता. मारियाच्या सूचनेकडे दुर्लक्ष करुन उड्डान करण्यात आल्याचा आरोप मारीयाचे पती प्रभात यांनी केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -