घरमुंबईहिरो बनण्यासाठी आले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले

हिरो बनण्यासाठी आले आणि पोलिसांच्या तावडीत सापडले

Subscribe

हिरो बनण्यासाठी मुंबईत आलेले दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या हाती लागली आणि त्यांना पुन्हा घरी रवाना करण्यात आले. दादर आरपीएफ आणि जीआरपी यांच्या संयुक्त कामगिरीमुळे या मुलांना त्यांच्या आईवडिलांकडे सुखरूप सोपवण्यात येणार आहे.

हिरो बनण्यासाठी मुंबईत आलेले दोन अल्पवयीन मुले पोलिसांच्या हाती लागली आणि त्यांना पुन्हा घरी रवाना करण्यात आले. दादर आरपीएफ आणि जीआरपी यांच्या संयुक्त कामगिरीमुळे या मुलांना त्यांच्या आईवडिलांकडे सुखरूप सोपवण्यात येणार आहे. मुळचे झारखंडचे असणारे जितेंद्र रताल रवानी आणि रोहन सुरेंद्र रवानी अशी या दोन्ही मुलांची नावे असून ते झारखंडच्या धनबाद मधले आहेत. हिरो बनायचे आहे म्हणून झारखंडवरून हे दोघेही मुंबईत आले. झारखंडमधून गायब होताच रोहन कुमारच्या काकांनी धनबाद रेल्वे स्टेशनवर तक्रार नोंदवली होती.

त्यानुसार धनबाद आरपीएफ पोलिसांनी दोघांचेही मोबाईल लोकेशन सर्च करून ते मुंबईच्या दिशेने गेले असल्याचे तपासात स्पष्ट केले. झारखंडच्या धनबाद रेल्वे स्टेशनवर कार्यरत असणारे रोहित कुमार हे रोहन रवानाचे काका आहेत त्यांनीच दादर पोलिसांना भेट देऊन त्या दोघांना शोधून काढण्याची विनंती केली. आरपीएफ आणि जीआरपी पोलिसांच्या व्हाट्सअप ग्रुपवर दोघांचेही फोटो व्हायरल करण्यात आले आणि त्यांच्या मोबाईल लोकेशननुसार दादर स्थानकात सर्च ऑपरेशन सुरु झाले. अखेर हेडकॉन्स्टेबल टिंगरे आणि रेल्वे पोलीस दलात काम करणार्‍या विनिता शुक्ला यांना पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर हे दोघेही सापडले. आम्हाला हिरो बनायचे असल्याने आम्ही प्रसिद्ध कलाकार आणि दिग्दर्शकांना भेटणार आहोत. त्यामुळे घरी जाणार नाही असे सांगणार्‍या या मुलांची फसवणूक होऊ नये म्हणून दादर जीआरपी आणि आरपीएफ यांच्या संयुक्त कामगिरीमुळे यांना पुन्हा त्यांच्या घरी पाठवण्यात येणार आहे. सध्या दोघांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली असून लवकरच त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात येणार असल्याची माहिती दादर रेल्वे पोलिसांकडून देण्यात आली आहे.अनेक स्वप्ने उराशी बाळगून अनेकजण मुंबईत येतात. मात्र ती सगळी पूर्ण होतील का याची शास्वती नसते. पण अल्पवयीन वयात असा निर्णय घेतल्याने रोहन आणि जितेंद्र या दोघांचेही आयुष्य कदाचित उद्वस्थ झाले असते. दोघेही चुकून वाममार्गाला लागले असते तर कुटुंबाला नाहक त्रास सहन करावा लागला असता, असे रोहित कुमार म्हणाले.

- Advertisement -

धनबादहून प्राप्त झालेल्या संदेशाच्या आधारे आम्ही सर्चींग सुरू केले. पश्चिम रेल्वेच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर आमच्या युनिटला ते सापडले. सुरक्षेच्या दृष्टीने आम्ही त्यांना दादर जीआरपी पोलिसांकडे सोपवले आहे, लवकरच त्यांची भेट त्यांच्या पालकांशी करुन देण्यात येईल. -सतीश मेनन, वरिष्ठ पोलीस निरीक्षक,दादर आरपीएफ

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -