घरमुंबईफेसबुक लाइव्ह पडले महागात; राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष महिलेवर गुन्हा

फेसबुक लाइव्ह पडले महागात; राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष महिलेवर गुन्हा

Subscribe

अंबरनाथ येथील पोलिसांच्या कामात अडथळा आणणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष महिलेसह दोन महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एमपीडीए अंतर्गत प्रतिबंधक कारवाई करण्यात आलेल्या गुंडाला पोलीस कारवाईपासून वाचविण्याचा प्रयत्न करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्षांच्या चांगलेच अंगलट आले आहे. स्थानिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवती अध्यक्ष ऐश्वर्या मोटे यांनी आरोपिला पोलिसांपासून वाचविण्यासाठी फेसबुक लाईव्हचा आधार घेतला मात्र हा प्रकार त्यांच्या अंगलट आला. पोलिसांनी याप्रकरणी ऐश्वर्या सहित दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमके काय घडले?

अंबरनाथ येथील बी कॅबिन परिसरात अंबर हाईट्स या ठिकाणी राहत असलेल्या सिद्धू अभंगे या आरोपीवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यासाठी ठाणे येथील कोपरी पोलीस ठाण्याचे पथक पोलीस वाहनाने आले होते. या पथकाने अभंगेचा शोध घेण्यास सुरुवात केली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंबरनाथ युवती अध्यक्ष ऐश्वर्या चंद्रकांत मोटे, त्यांची आई मीना मोटे आणि आरती अभंगे यांनी पोलिसांना शिवीगाळ करून पोलीस तपासात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. तसेच ऐश्वर्या मोटे यांनी ही घटना फेसबुक लाईव्ह करून पोलीस कोणतीही माहिती आणि पूर्वसूचना न देता एखाद्याच्या घरात घुसून अत्याचार करीत असल्याचे वक्तव्य केले. ही घटना सुरु असताना आरोपींनी या संधीचा फायदा घेत पोलिसांच्या तावडीतून निसटला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात ऐश्वर्या मोटे, मीना मोटे, आरती अभंगे या आरोपी महिलांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

आमच्या शेजारी काही दिवसांपूर्वी सिद्धू अभंगे आणि त्याची पत्नी आरती अभंगे हे राहण्यासाठी आलेले आहेत. त्यांना आम्ही नीट ओळखत देखील नाही. पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई करण्याऐवजी ते आमच्या घरात घुसले कोणतीही ओळखपत्र न दाखविता आणि कारणे न देता आमच्या घरात प्रवेश केला. आम्हाला गुन्हेगारासारखी वागणूक दिली. आमच्या विरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले आहेत.  – ऐश्वर्या मोटे; राष्ट्रवादी काँग्रेस युवती अध्यक्ष


हेही वाचा – महाराष्ट्रावरचे संकट दूर करण्याची शक्ती दे; मुख्यमंत्र्यांची बाप्पाकडे प्रार्थना

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -