घरमुंबईSushant Singh Rajput Death : खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्या माध्यमांवर कारवाई

Sushant Singh Rajput Death : खोट्या बातम्या प्रसारित करणाऱ्या माध्यमांवर कारवाई

Subscribe

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात खोट्या बातम्या तसेच मुंबई पोलिसांबाबत बदनामीकारक वृत्त प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियावर मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेने कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. याप्रकरणी एका मीडियाला नोटीस पाठवून त्याच्यावर गुन्हा दाखल करून एकाला अटक करून जामिनावर सोडण्यात आले आहे.

सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाला आता राजकीय वळण लागले आहे. त्यात वृत्तवाहिनी तसेच सोशल मीडियावर खोटे वृत्त प्रसारित करून नागरिकांची दिशाभूल करण्यात येत असल्याचे आरोप केले जात आहेत. तसेच या सर्व प्रकरणात मुंबई पोलीस अपयशी ठरल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांची नाहक बदनामी करण्याचे काम काही वृत्तवाहिन्या तसेच सोशल मीडियावर सर्रासपणे सुरू आहे. खात्रीशीर तसेच कुठलाही पुरावा नसताना वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियावर मुंबई पोलीस दलाला बदनाम करण्यात येत असल्यामुळे मुंबई पोलीस दलाचे मनोबल खच्चीकरण करण्याचे काम सुरू आहे.

- Advertisement -

दरम्यान कुठलाही ठोस पुरावा अथवा खात्रीशीर माहिती नसताना सुशांतसिंह प्रकरणात खोटे वृत्त प्रसारित करणाऱ्या वृत्तवाहिन्या आणि सोशल मीडियाला मुंबई पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाकडून नोटीस जारी करण्यात येत आहे. त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी तसेच पुरावे सादर करण्यासाठी सायबर गुन्हे विभागाकडून आठ दिवसांची अवधी देण्यात आलेला आहे.

दरम्यान, सुशांतसिंह प्रकरणात अफवा पसरवणे, खोटे वृत्त प्रसारित केल्याप्रकरणी मुंबई सायबर गुन्हे शाखेने युट्यूबवरील एका वहिनीला नोटीस पाठवून ओमर सर्वज्ञ नावाच्या व्यक्तीवर भा.दं.वि. कलम ५०५(२),५००,५०१,५०४ प्रमाणे गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असल्याचे सायबर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -