घरमुंबईसीएसएमटी पुल दुर्घटना: दोषींवर होणार कडक कारवाई - मुख्यमंत्री

सीएसएमटी पुल दुर्घटना: दोषींवर होणार कडक कारवाई – मुख्यमंत्री

Subscribe

सीएसएमटी रेल्वे स्थानकाला जोडणाऱ्या पादचारी पुलाचा काही भाग कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू तर ३५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळी भेट दिली. अतिशय दुर्दैवी घटना असून या दुर्घटनेप्रकरण उच्चस्तरीय चौकशी केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. दरम्यान, जे दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच मृतांच्या कुटुंबियांनी ५० लाख आणि जखमींना ५० हजाराची मदत सरकारने जाहीर केली आहे.

- Advertisement -

पुलाच्या स्ट्रक्चर ऑडीटवर प्रश्नचिन्ह

या पादचारी पुलाचे काही दिवसांपूर्वी स्ट्रक्चर ऑडीट करण्यात आले होते. या मात्र त्यामध्ये पुल मजबूत असल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे स्ट्रक्टर ऑडीटवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. दरम्यान, या पुलामध्ये काही दुरुस्ती सांगण्यात आल्या होत्या त्याचे काम कुठ पर्यंत आले होते. याचा देखील तपास केला जाणार आहे. या तपासामध्ये कोणी दोषी आढळले तर त्यांच्याविरोध कडक कारवाई करत सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

- Advertisement -

मृतांच्या कुटुंबियांना ५० लाखांची मदत

सीएसएमटी दुर्घटनेत ५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे तर ३५ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांच्या कुटुंबियांना सरकारने ५० लाखांची मदत जाहीर केली आहे. तर जे जखमी झाले आहेत त्यांना ५० हजारांची मदत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. तसंच जखमींवर सर्व उपचार शासनामार्फत केले जाणार आहेत. प्राथमिक रिपोर्ट लवकरच हाती येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

जखमींची प्रकृतीत सुधारणा व्हावी

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन या दुर्घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे ‘ही घटना समजल्यानंतर खूप दु:ख झाले. या दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात मी सहभागी आहे. तसंच जे जखमी झाले आहेत त्यांच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना करतो. महाराष्ट्र सरकारने जखमींना ताबडतोब शक्य तितकी मदत पुरवावी.’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -