CSMT Bridge Collapse : पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेला हिमालय पादचारी पूल कोसळ्याची दुर्घटना सीसीटीव्हीत कैदत झाली आहे.

Mumbai
CSMT Bridge Collapse : CCTV footage of csmt bridge incident
पूल दुर्घटना सीसीटीव्हीत कैद

मुंबई महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस जवळ असलेला हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास कोसळून मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये ६ जणांचा मृत्यू झाला असून ३४ जण जखमी झाले आहेत. या जखमींना सेंटजॉर्ज, जीटी आणि सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या जखमींवर उपचार असून काहींची प्रकृत्ती चिंताजनक तर काहींची प्रकृत्ती स्थिर असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सीसीटीव्हीत सीएसएमटी स्थानकाला जोडणाऱ्या ब्रीजवर लोक चालताना दिसत असून पूल कोसळताच मोठा आवाज आला असून एकच गोंधळ दिसून येत आहे. तर काही लोकांनी भीतीने त्या ठिकाणाहून पळ काढला आहे.

या परिसरात मोठ्या प्रमाणात ऑफिसेस असल्यामुळे या ठिकाणी अनेकांची ये-जा सुरु असते. या परिसरात नरिमन पॉइंट, चर्चगेट आणि आसपासच्या परिसरातील कार्यालयांमधील नोकरदार मंडळी पूर्व उपनदरांत आपल्या घरी जाण्यासाठी या पुलाचा वापर करत असतात. त्यामुळे या परिसरात नागरिकांची प्रचंड वर्दळ असते. त्या दरम्यान, वाहनांची देखील गजबज असते. अशीच गजबज गुरुवारी देखील पाहायला मिळत होती आणि त्याच दरम्यान हा पूल कोसळून मोठी दुर्घटना झाली आहे.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे

या दुर्घटनेत अपूर्वा प्रभू (वय ३५), रंजना तांबे (४०), सारिका कुलकर्णी (३५), तपेंद्र सिंग (३५), जाहीद सिराज खान (३२) आणि मोहन कायगडे (५५) या सहा जणांचा मृत्यू झाला. अपूर्वा प्रभू आणि रंजना तांबे या जी. टी. रुग्णालयातील परिचारिका आहेत.

दुर्घटनेतील जखमींची नावे

सोनाली नवले (वय ३०), अद्वित नवले (३), राजेंद्र नवले (३३), राजेश लोखंडे (३९), तुकाराम येडगे (३१), जयेश अवलानी (४६), महेश शेरे, अजय पंडित (३१), हर्षदा वाघले (३५), विजय भागवत (४२), निलेश पाटवकर, परशुराम पवार, मुंबलिक जयस्वाल, मोहन मोजडा (४३), आयुशी रांका (३०), सिराज खान (५५), राम कुपरेजा (५९), राजेदास दास (२३), सुनील गिरलोटकर (३९), अनिकेत अनिल जाधव (१९), अभिजीत मान (२१), राजकुमार चावला (४९), सुभेष बॅनर्जी (३७), रवी लागेशेट्टी (४०), नंदा विठ्ठल कदम (५६), राकेश मिश्रा (४०), अत्तार खान (४५), सुजय माझी (२८), कनुबाई सोलंकी (४७), दीपक पारिख यांचा समावेश आहे.


वाचा – ‘मोदी सरकारने बुलेट ट्रेनचा तमाशा बंद करावा’ – संजय निरुपम

वाचा – ‘त्या’ पूलाच ऑडिट करण्यात IIT मुंबई, पालिका, रेल्वेचा निष्काळजीपणाच नडला


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here