घरमुंबईCSMT bridge collapse : जबाबदार व्यक्तीच्या अटकेची पोलिसाकडून तयारी

CSMT bridge collapse : जबाबदार व्यक्तीच्या अटकेची पोलिसाकडून तयारी

Subscribe

सीएसटीएम येथील पूल दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्ती अथवा अधिकारी यांच्या नावाचा अधिकृत अहवाल मिळताच दोषींवर कारवाई करून त्यांना अटक करण्याची तयारी मुंबई पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

सीएसएमटी येथील हिमालय पादचारी पूल दुर्घटनेला जबाबदार असणाऱ्या व्यक्ती अथवा अधिकारी यांच्या नावाचा अधिकृत अहवाल मिळण्याची पोलीस यंत्रणा वाट पाहत असून अगवाल हाती येताच यातील दोषींवर कारवाई करून त्यांना अटक करण्याची पूर्ण तयारी मुंबई पोलिसांकडून करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शनिवार, १६ मार्च रोजी आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या पोलीस अधिकाऱ्यांनी मनपाच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली असून या भेटीदरम्यान पोलिसांनी काही अधिकाऱ्यांचे नवा पत्ता मिळवला असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.

पोलिसांनी मिळवली अधिकाऱ्यांची नावं आणि पत्ते 

सीएसएमटी येथील हिमालय पादचारी पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी संबंधित घटनेला जवाबदार असणाऱ्यावर आझाद मैदान पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३०४ (अ), ३३७,३३८ (हयगयी व निष्काळजीपणाने मृत्यूस कारणीभूत) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या गुन्ह्यात अद्याप कुठल्याही यंत्रणेविरुद्ध अथवा व्यक्तीचे नाव घेण्यात आलेले नाही. या दुर्घटनेला नक्की जबादार कोण आहे, या पुलाचे स्ट्रक्चर ऑडिट कुठल्या कंपनीने केले होते. याबाबतची माहिती पोलिसांनी महानगर पालिकेकडे मागितली असून लवकरच महापालिकेकडून या संबंधाचा अहवाल आझाद मैदान पोलिसांना देण्यात येणार आहे. या अहवालात या दुर्घटनेला जवाबदार असणाऱ्या व्यक्ती, अधिकारी तसेच स्ट्रक्चरल ऑडिटर यांची माहिती असणार असून त्या अनुषंगाने पोलिसांकडून संबंधितांवर कारवाई करून त्यांना अटक करण्यात येणार आहे. दरम्यान, आझाद मैदान पोलीस ठाण्याच्या काही अधिकाऱ्यांनी महापालिकेच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांशी शनिवारी भेट घेतली असून या भेटीत पोलिसांना काही नावं, पत्ते देण्यात आले असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -