घरमुंबईcsmt bridge collapse - अधिकाऱ्यांवर निलंबणाची कारवाई

csmt bridge collapse – अधिकाऱ्यांवर निलंबणाची कारवाई

Subscribe

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी सेवेत असणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. तर दोन निलंबित अधिकाऱ्यांची चौकशी होणार आहे.

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी कारवाई सुरु झाली आहे. पुलाची एकंदरीत स्थिती चांगली असल्याचं प्रमाणपत्र प्रशासनाकडून बहाल करण्यात आलं होतं. या पुलाचं काँक्रिट आणि पोलादची स्थिती चांगली असल्याचं सांगितलं गेलं होतं. परंतु, तरीही हा पूल कोसळला. देसाई असोसिएट या कंत्राटदार कंपनीने या पूलाचे स्ट्रक्चर ऑडिट केलं होतं. त्यामुळे या कंपनीलाही जाब विचारण्यात येणार आहे. याप्रकरणी तत्कालीन मुख्य अभियंता आणि उपमुख्य अभियंताविरोधात कारवाई करण्यात येणार आहे. त्यांची चौकशी केली जाणार आहे. देसाई असोसिएटनं केलेल्या पुलांचं पुन्हा ऑडीट केलं जाणार आहे. त्याचबरोबर या कंपनीला दिलेलं काम काढून घेऊन इतर पर्यायी कंपनीला दिलं जाणार आहे. त्याचबरोबर धोकादायक पुलाबद्दल स्ट्रक्चर ऑडिटरनं आवाज उठवला नाही म्हणून आरपीएस इन्फ्रा कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. यासोबतच डीडी असोसिएटला स्ट्रक्चरल ऑडिट पॅनलवरुन हटवण्यात आलं आहे.

हेही वाचा – सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी याचिका दाखल; २२ मार्चला हाय कोर्टात सुनावणी

- Advertisement -

‘या’ अधिकाऱ्यांना केलं निलंबित

सीएसएमटी पूल दुर्घटनेप्रकरणी पहिली कारवाई करण्यात आली आहे. या घटनेप्रकरणी मुख्य कार्यकारी अभियंता ए. आर. पाटील, सहाय्यक अभियंता एस. एफ. काकुळते यांना निलंबित करण्यात आले आहे. यासोबतच निवृत्त मुख्य अभियंता एस. ओ. कोरी आणि निवृत्त उपमुख्य अभियंता आर . बी. तारे यांची चौकशी होणार आहे. तर कंत्राटदार कंपनीला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. काल संध्याकाळी सीएसएमटी येथे पूल कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३६ जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर नेहमीप्रमाणे आरोप-प्रत्यारोपाचे राजकारण सुरु झाले आहे. दरम्यान, या पूलाचे ऑडीट करणाऱ्या कंत्राटदार कंपनीला जाब विचारण्यात येणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -