घरमुंबईब्रीजवरुन कोसळून 'तो' आदळला थेट डिव्हायडर

ब्रीजवरुन कोसळून ‘तो’ आदळला थेट डिव्हायडर

Subscribe

वडाळ्यात राहणारा २० वर्षीय अनिकेत जाधव आपलं काम संपून घरी परतत असताना नेमका सीएसएमटी ब्रीजवरुन खाली कोसळून डिव्हायडरवर आदळला. त्यामुळे त्याच्या पाठीला गंभीर दुखापत झाली आहे.

शिकत शिकत काम करणारा अनिकेत नेहमीप्रमाणे सीएसएमटीच्या ब्रीज वरुन घरी जात होता. रोज आठ वाजता घरी परतणारा अनिकेत जाधव परतला नाही म्हणून घरच्यांनाही टेंशन आलं. पण, नंतर अनिकेतच्या मित्रांनी त्याच्या कुटुंबियांना फोन वरुन या दुर्घटनेबद्दल कळवलं. त्यानंतर त्याच्या घरच्यांनी सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.या दुर्घटनेत अनिकेत जखमी असून त्याच्या पाठीला आणि कंबरेला जबरदस्त मार बसला आहे. त्याच्या पाठीवर कामाची बॅग होती म्हणून त्याला बाकी कुठेही गंभीर मार बसलेला नाही. अनिकेतच्या हिप आणि पाठीच्या कण्याला फ्रॅक्चर झालं आहे. मात्र या घटनेनं फक्त त्याच्या शरीरावर नाही तर मनावरही खूप मोठा परिणाम झाला आहे. त्याचं सीटीस्कॅन आणि एक्स-रे काढण्यात आले आहेत. मात्र या घटनेनं फक्त त्याच्या शरीरावर नाही तर मनावरही खूप मोठा परिणाम झाला आहे. त्याचं सीटीस्कॅन आणि एक्स-रेकाढण्यात आले आहेत.

पाठ आणि कंबरेला मार

अनिकेतची आई बंदीनी अनिल जाधव यांनी सांगितलं की, ” तो आठ वाजण्याच्या आधीच घरी पोहोचतो. पण, तो आला नाही म्हणून आम्हाला खूप काळजी वाटली. त्याच्या मित्रांनी आम्हाला फोन करुन सांगितलं. तेव्हा या दूर्घटनेबद्दल कळलं. आम्ही थेट सेंट जॉर्ज हॉस्पिटल गाठलं. त्याच्या पाठीवर मार बसला आहे. पायाला ही लागलं आहे. ”तर, अनिकेतने सांगितलं की, ” मी नेहमीप्रमाणे घरी जात होतो. पण, मला थोडा उशिर झाला. तेवढ्यात पूल खाली कोसळला आणि मी डिव्हायडरवर कोसळलो. पाठ आणि कंबरेला खूप मार बसला आहे.

- Advertisement -

दुर्घटनेत ३६ जखमी

काल संध्याकाळी सीएसएमटी येथे पूल कोसळल्याची मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३६ जण जखमी झाले आहेत. अपूर्वा प्रभू, भक्ती शिंदे, रंजना तांबे या तीन परिचारिकांचा मृत्यू झाला तर जीटी हॉस्पिटलचे एक कर्मचारी जखमी झाले आहेत. चौघेही एकाच वेळेस जीटी हॉस्पिटलमध्ये रात्रपाळीसाठी येत होते. पण, पूल कोसळला आणि या तीन परिचारिका कोसळल्या आणि त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. पण, पुरुष कर्मचाऱ्याने पुलावरुन लगेच उडी मारल्यामुळे ते गंभीर जखमी झाले आहेत. या तीन परिचारिकांपैकी भक्ती शिंदे यांचं कुटुंब त्यांच्यावरच अवलंबून होतं. त्यांचे दोन्ही भाऊ या जगात नाहीत त्यामुळे आपल्या मुलासह भावांच्या मुलांची जबाबदारीदेखील त्यांच्यावर होती. त्यांच्या जाण्यानं कुटुंबाचा आधार हरपल्याची भावना ही या सहकर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -