घरमुंबईफिल्मी स्टाईलने आरोपी जाळ्यात

फिल्मी स्टाईलने आरोपी जाळ्यात

Subscribe

कृष्णा मानवीरसिंग बागेल या उत्तर प्रदेशातील तरुणाची मुंबईतील एका तरुणीसोबत ओळख झाली. कृष्णाने त्या तरुणीला लग्नाची मागणी घातली. मात्र तरुणीने ती मागणी फेटाळताच, तिची मॉर्फ केलेली अश्लिल छायाचित्रे सोशल मिडियावर टाकून कृष्णाने तिचा विनयभंग केला.

कृष्णा मानवीरसिंग बागेल या उत्तर प्रदेशातील तरुणाची मुंबईतील एका तरुणीसोबत ओळख झाली. कृष्णाने त्या तरुणीला लग्नाची मागणी घातली. मात्र तरुणीने ती मागणी फेटाळताच, तिची मॉर्फ केलेली अश्लिल छायाचित्रे सोशल मिडियावर टाकून कृष्णाने तिचा विनयभंग केला. तरुणीने त्याची तक्रार मुंबई पोलिसांकडे केली. मात्र कृष्णा उत्तर प्रदेशात असल्यामुळे त्याच्या अटकेत अडचणी येत होत्या. अभिनयाची आवड असलेल्या कृष्णाला ट्रॅप करायला पोलिसांनी त्या तरुणीच्या पालकांच्या मदतीने एक प्लान रचला. चित्रपटात अभिनयाची ऑफर देऊन त्याला मुंबईत बोलावले आणि अलगद पकडले. एकाद्या हिंदी चित्रपटाला शोभेल अशी ही घटना साकीनाक्यात घडली आहे.

तक्रारदार तरुणी ही एका खाजगी कंपनीत कामाला आहे. सध्या ती तिच्या पालकांसोबत साकिनाका परिसरात राहते. फेसबुकवरील अकाऊंटवरून तिची काही महिन्यांपूर्वीच कृष्णा बागेल (२७) याच्याशी ओळख झाली होती. मैत्री अधिक घट्ट झाल्यावरून कृष्णाने तिला प्रपोज करुन लग्नाविषयी विचारणा केली होती. मात्र तिने लग्नाला नकार दिला. तिच्या नकाराने कृष्णाला प्रचंड राग आला. त्यामुळे तो तिला त्रास देऊ लागला. लग्नास तयार झाली नाहीतर परिणाम वाईट होतील अशी धमकी देऊ लागला. इतकेच नव्हे तर तिचा चेहरा आणि इतर महिलांचे अर्धनग्न फोटो मॉर्फ करुन त्याने फेसबुकवर अपलोड केले. हा प्रकार त्या तरुणीला आपल्या मित्र-मैत्रिणीकडून समजताच तिने तिच्या पालकांना ही माहिती दिली. त्याची तक्रार साकीनाका पोलीस ठाण्यात करण्यात आली.

- Advertisement -

मै हूं रिक्षावाला

ही शोधमोहीम सुरु असतानाच कृष्णा उत्तर प्रदेशात राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्याला अभिनयाची प्रचंड आवड असल्याचीही माहिती मिळाली. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी पोलिसांनी तक्रारदार तरुणीच्या पालकांची मदत घेतली होती. तरुणीच्या पालकांनी कृष्णाशी संपर्क साधून, ‘आपण चित्रपटाची निर्मिती करत आहोत. त्या चित्रपटाचे नाव ‘मै हूं रिक्षावाला’ असे आहे. या चित्रपटात त्याला मुख्य अभिनेत्याची भूमिका देण्याचा विचार आहे. अशी संधी पुन्हा मिळणार नाही. लवकरच चित्रपटाच्या शूटींगला सुरुवात आहे, त्यामुळे त्याने तातडीने मुंबईत यावे ’असा संदेश त्याच्या फेसबुकवर पाठवला.

आनंदाने निघाला

हा मॅसेज वाचल्यानंतर कृष्णा हादेखील खुश झाला. कुठलाही विचार न करता तो 26 जुलैला उत्तर प्रदेशातून मुंबईत येण्यास निघाला. त्याने फेसबुकवर सर्व मित्रांना बाय करुन आपण बॉलीवूडमध्ये काम करण्यास निघालो आहे, लवकरच ‘मै हूं रिक्षावाला’ या चित्रपटातून आपण अभिनय क्षेत्रात पर्दापण करीत आहोत असा मॅसेज दिला. शुक्रवारी 27 जुलैला तो साकिनाका परिसरात निर्मात्याला भेटण्यासाठी साकिनाका परिसरात आला होता. यावेळी तिथे आधीपासून पाळत ठेवलेल्या साकिनाका पोलिसांच्या एका विशेष पथकाने कृष्णा बागे याला शिताफीने अटक केली.

- Advertisement -

३१ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

अटकेनंतर त्याला शनिवारी वांद्रे येथील स्थानिक न्यायालयात हजर करण्यात आले होते, यावेळी न्यायालयाने त्याला 31 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याने अशाच प्रकारे अन्य काही तरुणींचा विनयभंग किंवा त्यांना धमकी दिली आहे का याचा आता पोलीस तपास करीत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -