घरमुंबईसोन्याच्या तस्करीचा नवा फंडा, कस्टम अधिकारीही चक्रावले!

सोन्याच्या तस्करीचा नवा फंडा, कस्टम अधिकारीही चक्रावले!

Subscribe

मोबाईलच्या फ्लिप कव्हरमधून सोन्याची बिस्किटं लपवून तस्करी करणाऱ्या चोरांना मुंबई विमानतळावर कस्टमच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे.

सोन्याची तस्करी करणारे तस्करीसाठी काय शक्कल लढवतील याचा नेम नाही! अशाच एका सोनं तस्करी करणारा तस्कर चक्क मोबाईल फोनच्या फ्लिप कव्हर मधून सोन्याची तस्करी करीत असल्याचे उघडकीस आले आहे. मुंबईच्या आतंरराष्ट्रीय विमानतळावरून गुरुवारी कस्टम अधिकाऱ्यांनी या सोने तस्करला अटक करून त्याच्याकडून ५७ लाख ५० हजार रुपये किंमतीची सोन्याची बिस्किटं जप्त केली आहेत. ही सर्व बिस्किटं मोबाईल फोनच्या फ्लिप कव्हरमध्ये लपवण्यात आली होती. यासंदर्भात जितेंद्र बाबूलाल सोळंखी असे अटक करण्यात आलेल्या तस्कराचे नाव आहे.

OMG! See where they hide 3 kg gold!

पाहा ३ किलो सोनं कुठे लपवून आणलं या भामट्यांनी! शोधणाऱ्या पोलिसांना मानलं पाहिजे!

Posted by My Mahanagar on Friday, 26 October 2018

- Advertisement -

…आणि पोलिसांना संशय आला!

जितेंद्र हा २५ ऑक्टोबर रोजी बँकॉकवरून छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या ठिकाणी आला होता. विमान लँड झाल्यानंतर ग्रीन कॉरिडॉर मधून तो बाहेर पडत असताना कस्टम अधिकाऱ्यांना त्याच्यावर संशय आला. त्यामुळे त्यांनी जितेंद्रला थांबवून त्याच्याजवळ असलेल्या सामानाची झडती घेतली. जितेंद्रजवळ यावेळी एक काळ्या रंगाची बॅग होती. ही बॅग दिसायला साधी असली, तरी तिचं वजन मात्र प्रमाणापेक्षा जास्त असल्याचं कस्टमच्या अधिकाऱ्यांच्या ध्यानात आलं.


हेही वाचा – व्हॉट्सअॅपवरुन ड्रग्जची तस्करी

- Advertisement -

सोन्याचे फ्लिप कव्हर

अधिकाऱ्यांनी बॅग तपासली असता त्यात मोबाईल फोनला लावण्यात येणारे फ्लिप कव्हर सापडले. मात्र, हे फ्लिप कव्हर जड लागत होते. म्हणून अधिकाऱ्यांनी फ्लिप कव्हर उघडून त्याची तपासणी केली असता त्यांना खरा प्रकार समजला. या बहाद्दरानं या फ्लिप कव्हरमध्ये चक्क सोन्याची बिस्किटं अत्यंत पद्धतशीरपणे लपवली होती. कस्टम अधिकाऱ्यांनी सर्व कव्हर ताब्यात घेऊन तपासले असता तर त्यात तब्बल २ किलो ९९७ ग्रॅम म्हणजेच जवळपास तीन किलो वजनाची सोन्याची बिस्किटं सापडली. कस्टम अधिकाऱ्यांनी ही सर्व बिस्किटं ताब्यात घेतली. या सोन्याच्या बिस्किटांची किंमत भारतीय बाजारात ८७ लाख ५१ हजार असल्याचे सांगण्यात आले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -