घरमुंबईमुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक

मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर अटॅक

Subscribe

मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले.

मुंबई विद्यापीठाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाला आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात तांत्रिक अडचण निर्माण झाली असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. यासंदर्भात विद्यापीठाकडून मुंबई पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार दाखल करण्यात येणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या तृतीय वर्ष बीकॉम व बीएच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परीक्षा तांत्रिक संकटामुळे पुढे ढकलण्याचा निर्णय मंगळवारी घेण्यात आला. मंगळवारी परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना लिंक न मिळणे, लॉगिन आयडी व पासवर्ड न मिळणे यामुळे परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाकडून घेण्यात आला. या परीक्षेच्या तारखा लवकरच ठरवून त्या विद्यापीठाच्या संकेतस्थळावर व आयडॉलच्या लिंकवर प्रदर्शित केल्या जाणार आहेत. मात्र यासंदर्भात मुंबई विद्यापीठाकडून तपासणी केली असता ऑनलाईन परीक्षेच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याचे आढळून आले. त्यादृष्टीने विद्यापीठाकडून तक्रार नोंदविण्यात येणार आहे. सायबर हल्ल्यामुळे ६ ऑक्टोबरबरोबरच ७ ऑक्टोबरला होणारी परीक्षाही पुढे ढकलली असल्याचे विद्यापीठाकडून सांगण्यात आले. ६ व ७ ऑक्टोबर २०२० रोजीच्या या परीक्षांच्या नवीन तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -