घरमुंबईसावधान मुंबईकर; वादळी पावसाचा बसणार तडाखा

सावधान मुंबईकर; वादळी पावसाचा बसणार तडाखा

Subscribe

प्राप्त माहितीनुसार वेगवान वारे किनारपट्टीवर धडकण्यास सुरूवात झाली आहे.

समुद्र किनाऱ्याजवळ जाणाऱ्या मुंबईकरांसाठी एक धोक्याची सूचना आहे. वायू चक्रीवादळ २५० किलोमीटर प्रतितास या वेगाने मुंबईजवळून जात असल्याने वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता असून समुद्र खवळणार आहे. तसेच किनाऱ्यावर मोठमोठ्या लाटा निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत दुपारी केव्हाही पावसाला सुरूवात होण्याची शक्यता असून काही ठिकाणी थोडा थोडा पाऊस पडत आहे. येत्या १२ तासांत मुंबई आणि किनारपट्टीच्या परिसरात जोरदार वादळी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार वेगवान वारे किनारपट्टीवर धडकण्यास सुरूवात झाली असून दुपारी १च्या दरम्यान मस्जीद बंदर येथील गोदामांवर आच्छादित केलेले प्लॅस्टिक शीटस्‌ वाऱ्याने उडाल्याचे समजते. सकाळी आठ ते रात्री आठ या कालावधीत समुद्रात मोठ्या लाटा निर्माण होण्याची शक्यता असून समुद्र खवळलेला राहिल त्यामुळे मरीन ड्राईव्हसह किनारपट्टीलगतच्या ठिकाणी मुंबईकरांनी सावधगिरी बाळगावी असा इशारा देण्यात आला आहे. तसेच दोन बोटी समुद्रात बुडाल्याची माहिती समजत असून मासेमारी करताना सावधता बाळगावी असा इशारा हवामानखात्याने दिला आहे.

- Advertisement -

दरम्यान हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार वायू चक्रीवादळाचा मोठा फटका गुजरातला बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पोरबंदर आणि कच्छ येथील किनारपट्टीलगतच्या सुमारे ३ लाख नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -