दादरचा पादचारी पूल १३ दिवसांसाठी बंद राहणार

सीएसएमटी स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळ्याची दुर्घटना ताजी असतानाच आता दादरमधील रेल्वे फलाटाला जोडलेला पादचारी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे.

Mumbai
Dadar footover bridge
दादर पादचारी पूल

सीएसएमटी स्थानकाजवळील पादचारी पूल कोसळ्याची दुर्घटना ताजी असतानाच आता दादरमधील रेल्वे फलाटाला जोडलेला पादचारी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. आज, शनिवारी पश्चिम रेल्वे प्रशासनाने यासंबंधीचे पत्रक जारी केले असून हा पूल उद्या, १७ मार्चपासून पुढील १३ दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार असल्याचे यामध्ये नमूद करण्यात आले आहे. ही माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रविंद्र भाकर यांनी दिली आहे. त्यामुळे दादरचा हा पूल पुढील १३ दिवस वाहतुकीसाठी बंद राहणार आहे.

तब्बल तीन महिन्यांसाठी रॅम्प बंद 

पूल कोसळण्याच्या घटनेनंतर दादरमधील पादचारी पुलाच्या डागडुजी तसेच देखरेखीकरता हा पूल प्रवाशांसाठी बंद ठेवला जात असून त्यामुळे फलाट क्रमांक १ वरील रॅम्प आणि फलाट २ व ३ वरील पायऱ्यांचा वापर प्रवाशांना करता येणार नाही. फलाट क्र. २ व ३ च्या डागडुजीकरता १३ ते २९ मार्च दरम्यान येथील रहदारी बंद राहणार असून फलाट क्र. १ येथील रॅम्प तब्बल ९० दिवसांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे १७ मार्च ते १६ जून या कालावधीत प्रवाशांना दक्षिणेकडील पादचारी पूल रहदारीसाठी वापरता येणार असल्याचेही पत्रकात नमूद केले आहे. दरम्यान, प्रवाशांना या पुलावरून पूर्व ते पश्चिमेकडील ये-जा करणे शक्य आहे.