दादर टीटी होणार फेरीवाला मुक्त?

दादर हे नेहमीच गजबजलेले असते. फेरीवाल्यामुळेच दादरला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. त्यामुळे दादरमधील टीटी ही बाजारपेठ फेरीवाले मुक्त करणार असे सांगण्यात येत आहे.

Mumbai
dadar TT.
दादर टीटी (सौजन्य-मुंबई मिरर)

मुंबई म्हंटल की, गर्दी ही आलीच. मुंबईत अनेक ठिकाणं अशी आहेत, जिथे सर्रास गर्दी पाहायला मिळते. एखाद्या ठिकाणी गर्दी नसल्याचे आढळल्याचं नवलचं. त्यामधील एक महत्त्वाच ठिकाणं म्हणजे दादर. दादर ही मुंबई शहराची ओळखदेखील म्हणता येईल. दादरमध्ये अनेक ठिकाणं अशी आहेत. जिथे मोठ्या प्रमाणात बाजारपेठ आहेत. हा परिसर सर्वसामान्य लोकांच्या जीवनातील अविभाज्य घटक आहे. दादर टीटी ही एक अशीच बाजारपेठ आहे. परंतू आता हा दादर टीटी परिसर फेरीवाला मुक्त करण्यात येणार आहे. कारण दादर येथे असणारे फेरीवाले हे फूटपाथवर येऊन धंदा करतात. त्यामुळे तेथील रहिवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.

पालिकेकडे प्रस्ताव प्रलंबित

त्यामुळेच, दादर टीटी आता फेरीवाला मुक्त करण्याचा प्रस्ताव एफ वॉर्डचे सहाय्यक अधिकारी केशव उबाळे यांनी टाउन प्लानिंग योजनेअंतर्गत महानगरपालिकडे मांडला आहे. परंतू हा प्रस्ताव अजूनही महानगरपालिकडे प्रलंबित असल्याचे उबाळे यांनी म्हटले आहे. पुढे उबाळे म्हणाले आहेत की, या निर्यणामुळे फेरीवाल्यांच्या रोजगारावर कोणताही परिणाम होणार नाही, याची दक्षता पालिकेकडून घेतली जाणार आहे.

काय वाटतं दादरकरांना 

दादर टीटीमध्ये २५० फेरीवाले गेली ४५ वर्ष धंदा करत आहेत. फक्त दादर टीटी नाही तर, सायन सर्कल आणि महेश्वरी उद्यान या ठिकाणीदेखील मोठ्या प्रमाणात फेरीवाले बसत असून त्यामुळे ट्रॅफिक होताना दिसते. शहरातील इतर ठिकाणांच्या तुलनेत या परिसरांमध्ये जास्त वाहतूक कोंडी पाहायला मिळते. दादरसारख्या मध्यस्थानी असलेल्या ठिकाणी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे येथे राहणारी लोकं कामानिमित्त दादरला येत असतात. त्यांना रोजच्या जीवनात ट्रॅफिक आणि गर्दीला समोरे जावे लागते. तसेच शाळकरी मुलांनादेखील येण्या-जाण्यासाठी फुटपाथऐवजी रस्त्यावरून जावे लागते. फुटपाथ हा चालण्यासाठी नसून फेरीवाल्यांसाठी बांधण्यात आला आहे का?, असा संतप्त सवाल नागरीकांकडून होत आहे.