घरमुंबईदहीहंडी उत्सव : सकाळपासून ६० गोविंदा जखमी

दहीहंडी उत्सव : सकाळपासून ६० गोविंदा जखमी

Subscribe

दहीहंडी उत्सवादरम्यान गोविंदा जखमी झाल्याच्या या घटनांमुळे, पुन्हा एकदा गोविंदाच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.

मुबंईसह, ठाणे, नवी मुंबई अशा अनेक भागांमध्ये सकाळपासूनच दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळतो आहे. मात्र,
एकीकडे दहीहंडीचा जल्लोष पाहायला मिळत असताना दुसरीकडे काही ठिकाणी या उत्सवाला गालबोट लागल्याचं दिसत आहे. आतापर्यंत दहीहंडीच्या खेळात एकूण ६० गोविंदा जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या गोविंदांपैकी काहींवर उपचार सुरु असून, काही गोविंदांना उपचारानंतर सोडण्यात आले आहे. या घटनांमुळे पुन्हा एकदा दहीहंडी पथकातील गोविंदाच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे.  एकूण जखमी – ६० त्यापैकी ४० गोविंदांवर उपचार सुरु तर २० गोविंदांना डिस्चार्ज. दरम्यान जखमी झालेल्या ६० गोविंदांपैकी कोणत्या हॉस्पिटलमध्ये किती गोविंदांसाठी उपचारासाठी दाखल झाले आहेत, याचा आकडेवारी खालीलप्रमाणे :

केईएम – ४ 
नायर – ७
अग्रवाल – २
राजावाडी – ७
महात्मा फुले – १
व्ही एन देसाई – ४
बांद्रा भाभा – ५
एस के पाटील – २ 
पोद्दार – २
सायन हॉस्पिटल – २
रहेजा हॉस्पिटल – १
सेंट जॉर्ज हॉस्पिटल – १
ट्रॉमा केअर हॉस्पिटल – ४

- Advertisement -
दरम्यान जखमी गोविंदांपैकी हाती आलेली काही नावं पुढीलप्रमाणे :
  • रविराज चांदोरकर (३५) – कालेलकर गोविंद पथक
  • मनाली मेने (१८) – श्री गणेश गोविंदा पथक
  • जान्हवी पतोडे (१४) – श्री गणेश गोविंद पथक
  • शंकर कागलाराम (६१) – मयूर नायक गोविंदा पथक (केइएम हॉस्पिटलमध्ये दाखल)
  • अमेय पाटील – वडाळा गोविंदा पथक
  • आकाश माळी (१६) (व्ही एन देसाई हॉस्पिटलमध्ये दाखल)
  • रविंद्र कांबळी (३७)
  • सचिन गायकवाड (३०)
  • वेद कुलाबकर (९)

     

पाहा : काँग्रेसची ‘भाजप विरोधी’ हंडी

 

7 govinda got injured in mumbai
एक जखमी गोविंदा

जखमी गोविंदाला १ लाखाची मदत

तर दुसरीकडे शनिवारी (काल) खारदांडा येथील गोविंदा पथकात सराव करत असताना, १४ वर्षीय चिराग पाटेकर हा गोविंदा देखील जखमी झाला. याप्रकरणी भाजप अध्यक्ष आमदार अॅड. आशिष शेलार यांनी आज सकाळी चिरागच्या कुटुंबियांची भेट घेतली. तसंच शेलार यांनी चिरागसाठी १ लाख रुपयांची मदत देखील देऊ केली. सध्या चिराग खार येथील होली फॅमिली हॉस्पिटलच्या ICU वॉर्डमध्ये उपचार घेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -