घरमुंबईमुंबईतील बहुतांश दहीहंड्या रद्द; ‘गोविंदां’मध्ये नाराजी

मुंबईतील बहुतांश दहीहंड्या रद्द; ‘गोविंदां’मध्ये नाराजी

Subscribe

महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या भागात आलेल्या महापूरामुळे मुंबईतील ७०% दहीहंड्या रद्द

मुंबईसह अनेक उपनगरामध्ये तसेच, कल्याण, डोंबिवली आणि ठाणे या परिसरामध्ये दरवर्षी दहीहंडीचा उत्साह असतो. मात्र यंदा महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली या भागात आलेल्या महापूरामुळे मुंबईतील ७०% दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबई-उपनगर तसेच ठाण्यातील या लहान-मोठ्या दहीहंड्या रद्द करण्यात आल्याने संपुर्ण अनेक पुरूषांसह महिला गोविंदा पथकांमध्ये नाराजी दिसत आहे.

तयारी वाया गेल्याने गोविंदा पथकांचा हिरमोड

यंदा आलेल्या महाराष्ट्रातील महापूराच्या सावटामुळे मोठ्या आयोजकांसह नावालेल्या पथकांनी या पूरपरिस्थितीची पार्श्वभूमीवर या पथकांनी माघार घेतल्याने यंदाच्या दहीहंडी उत्सवावर निरुत्साहाचे वातावरण पाहायला मिळते आहे. दहीहंडी असल्य़ाने बऱ्याच गोपाळ आणि गोपिकांनी या उत्साहासाठी केलेले जय्यत तयारी मात्र वाया जाणार आहे. त्यामुळे गोविंदा पथकांचा हिरमोड झाला आहे.

- Advertisement -

याकरिता दहीहंड्या रद्द करण्याचा निर्णय

मुंबईतील दहीहंडी या नेहमीच प्रकाशझोतात असतात. तसेच आगामी विधानसभा निवडणूक असल्याने दणक्यात गोपाळ-गोपिकांकरिता ढाकुमाकूम करत हंडीतील माखन चोरण्यासाठी मोठ्या आकर्षण बक्षीसं असणाऱ्या मंडळाकडून यंदा मोठ्या प्रमाणात गोविंदाचे आयोजन केले जाईल, अशी शक्यता होती. मात्र यावेळी महापूराचे संकट आणि पूरपरिस्थिती उद्भवल्याने अनेक दहीहंड्या रद्द करण्याचा निर्णय बड्या आयोजकांनी घेतला आहे.

महाराष्ट्रातील पूरग्रस्ताबाबत असलेली सामाजिक आणि कर्तव्यभावना जपण्यासाठी तसेच बिकट परिस्थिती पूरग्रस्तांवर ओढावली असताना दहीहंडीचा उत्साह करणं योग्य नाही, असे मुंबईकरांनी ठरवले आहे. त्यामुळे मोठय़ा गोविंदा आयोजकांनी माघार घेतल्याने उत्सव शांततेत पार पडून वाहतूक कोंडीही होणार नाही, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

- Advertisement -

मुंबईतील ७० % दहीहंड्या रद्द!

मुंबईतील गिरगाव, लालबाग, परळ, काळाचौकी, दादर, माहीम, वरळीसह उपनगरांत घाटकोपर, बोरिवलीसह अनेक ठिकाणी मोठ्या रकमेच्या हंड्या लावण्यात येतात. मात्र या भागातील जवळजवळ सर्वच मोठ्या हंड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -