घरमुंबईवैद्यकीय अधिकार्‍याअभावी दहिसरचा दवाखाना बंद

वैद्यकीय अधिकार्‍याअभावी दहिसरचा दवाखाना बंद

Subscribe

पालघर जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाचा दहिसर तर्फे मनोरचा दवाखाना वैद्यकीय अधिकारी नसल्याने गेल्या दहा दिवसांपासून बंद आहे. त्यामुळे दहिसर परिसरातील रुग्णांना महागड्या खाजगी डॉक्टरांकडे वैद्यकीय उपचार घ्यावे लागत आहेत. त्यामुळे रुग्णांच्या आर्थिक भुर्दंड बसत असून त्यांची गैरसोय होत आहे.

दहिसर, गुंदावे, साखरे, नावझे आणि गिराळे यागावांमधील लोकसंख्या दहा ते बारा हजार आहे. या ग्रामस्थांना दहिसरच्या जिल्हा परिषदेचा दवाखाना सोयीचा आहे. त्यामुळे रुग्ण मोठ्या संख्येने उपचारासाठी दहिसरला येतात. पावसाळ्यात संसर्गजन्य आजारांत वाढ होत असल्याने बेताची आर्थिक परिस्थिती असलेले रुग्ण माफक दरात आरोग्य सेवा उपलब्ध असलेल्या जिल्हा परिषदेच्या दवाखान्यात उपचारासाठी येतात. दहिसर परिसरापासून मासवण प्राथमिक आरोग्य केंद्र आणि मनोरचे ग्रामीण रुग्णालयाचे अंतर सुमारे पंधरा किलोमीटर आहे. त्यामुळे त्याठिकाणी जाण्यासाठी रुग्णांचा प्रवास भाडे खर्च वाढतो. तसेच वेळेचा अपव्यय होत असल्याने दहिसरच्या दवाखान्यात मोठ्या संख्येने रुग्ण उपचारासाठी येत असतात.

- Advertisement -

शुक्रवारपासून दहिसरचा दवाखाना बंद आहे. पावसाळ्यात आजार बळावत असल्याने रुग्णांची संख्या वाढली आहे. त्यात दवाखाना बंद असल्याने रुग्णांचे प्रचंड हाल सुरू आहेत. त्यांना खासगी डॉक्टरांकडे उपचाराशिवाय पर्याय नाही. बेताची आर्थिक परिस्थितीच्या आदिवासी रुग्णांना यामुळे आर्थिक भुर्दंड पडत असून त्यांची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे दहिसरच्या दवाखान्यात तातडीने वैद्यकीय अधिकारी नियुक्त करून दवाखाना सुरू करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थ आणि रुग्णांकडून केली जात आहे.

दहा दिवसांपासून दहिसरचा दवाखाना बंद आहे. वैद्यकीय अधिकारी हजर होऊन दवाखाना कधी सुरू होणार याबाबतची माहिती सूचना फलकावर नाही. त्यामुळे अनेक रुग्ण सकाळी दवाखाना सुरू होण्याच्या वेळेत वैद्यकीय अधिकारी येण्याची वाटत पाहत असतात. दुपारपर्यंत वाट पाहून निराश झालेले रुग्ण खाजगी डॉक्टरांकडे उपचारासाठी जात असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

- Advertisement -

दहिसरच्या आयुर्वेदिक दवाखान्याबाबतची माहिती तालुका वैद्यकीय अधिकार्‍यांकडून लवकरच घेतली जाईल. त्याचप्रमाणे तातडीने दहिसरला वैद्यकीय अधिकारी पाठवण्याची व्यवस्था करण्यात येईल.
-डॉ दयानंद सूर्यवंशी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद, पालघर.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -