Saturday, August 8, 2020
Mumbai
29.1 C
घर ताज्या घडामोडी दातार एजन्सीचे व्यवस्थापक वर्मा यांचे निधन

दातार एजन्सीचे व्यवस्थापक वर्मा यांचे निधन

Thane
varm news paper agency
हरिशंकर वर्मा

ठाण्यातील टेम्बी नाक्यावरील सुप्रसिद्ध दातार न्यूज पेपर एजन्सीचे व्यवस्थापक हरिशंकर वर्मा यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे वृत्तपत्र सृष्टीचे खूप मोठे नुकसान झाले असल्याच्या भावना ठाणे जिल्हा वृत्तपत्र विक्रेता संघाचे अध्यक्ष कैलाश म्हापदी यांनी व्यक्त केल्या.

हरिशंकर वर्मा हे दातार न्यूज पेपर एजन्सीत मागील अनेक वर्षांपासून कार्यरत होते. एजन्सीमध्ये येणाऱ्या प्रत्येक वृत्तपत्र विक्रेत्याकडे तसेच वितरण सांभाळणाऱ्या प्रत्येक वृत्तपत्रांच्या प्रतिनिधीकडे ते नेहमीच आपुलकीने चौकशी करीत. ठाणे जिल्ह्यातील पेपर वितरणाचा त्यांचा दांडगा अभ्यास होता. मात्र ते कोरोना बाधित झाल्याने मागील काही दिवस रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु त्यांचा हा लढा अखेर अपयशी ठरला. आज त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनामुळे ठाण्यातील वृत्तपत्र सृष्टीवर शोककळा पसरली असल्याचे सांगत म्हापदी यांनी संघातर्फे श्रद्धांजली अर्पण केली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here