माटुंगा किंगसर्कल येथे आढळला बेपत्ता बाळाचा मृतदेह

माटुंगा येथील किंगसर्कल या ठिकाणी बेपत्ता असलेल्या एका १६ दिवसाच्या मुलीचा मृतदेह आढळून आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी शीव पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Mumbai
BDead body found at matunga kings circle of missing girlaby_2017082375
माटुंगा किंगसर्कल येथे आढळला बेपत्ता मुलीचा मृतदेह

किंगसर्कल येथील सुंदर कमला नगर येथील एका घरातून अचानक बेपत्ता झालेल्या १६ दिवसाच्या मुलीचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. माटुंगा किंगसर्कल येथील सुंदर कमला नगर येथे राहणाऱ्या एका महिलेने मंगळवारी रात्री शीव पोलीस ठाण्यात मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली होती. या मुलीचा शोध घेताना घराच्या मागच्या नाल्यात बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह आढळून आला आहे.

नेमके काय घडले?

किंगसर्कल येथील सुंदर कमला नगर येथील एका घरातून अचानक एक १६ दिवसाची मुलगी हरवली. त्या मुलीच्या आईंने मुलीची शोधाशोध घेतली मात्र, आपली मुलगी आढळून न आल्याने अखेर त्या चिमुरडीच्या आईने मंगळवारी शीव पोलीस ठाण्यात आपली मुलगी हरवल्याची तक्रार दाखल केली. या मुलीचा शोध घेत असताना मुलीच्या घराच्या मागच्या बाजूस असलेल्या नाल्यात या १६ दिवसाच्या मुलीचा मृतदेह पोलिसांना आढळून आला आहे. मृतदेह पाहून पोलिसांना देखील धक्का बसला असून याप्रकरणी शीव पोलीस शोध घेत आहेत.


वाचा – परभणीमध्ये भर उन्हात आढळली ‘नकुशी’

वाचा – जन्मदात्या आईला मुलगी झाली ‘नकुशी’


 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here