घरमुंबईमलबार येथे चवथ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू

मलबार येथे चवथ्या मजल्यावरुन पडून कामगाराचा मृत्यू

Subscribe

मलबार हिल येथे इमारतीच्या चवथ्या मजल्यावरुन पडून ब्रिजेंद्र रामदरस सहानी या 47 वर्षांच्या कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. याप्रकरणी कॉन्ट्रक्टरविरुद्ध मलबार हिल पोलिसांनी हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे. जुगुल विदेशी साहानी हे फर्निचर पॉलिश करण्याचे काम करीत असून ते सांगलीतील खानापूर, मायकानगरचे रहिवाशी आहे.

मृत ब्रिजेंद्र साहानी हे त्यांचे चुलत बंधू आहे. सध्या ते मलबार हिल येथील वाळकेश्वर रोडवरील ओम विकास टॉवर इमारतीमध्ये जुन्या खिडकीचे दुरुस्तीचे काम करीत होते. सोमवारी दुपारी साडेतीन वाजता ते काम करीत असताना अचानक त्यांचा तोल गेला आणि ते चवथ्या मजल्यावरुन खाली पडले. गंभीररीत्या जखमी झालेल्या ब्रिजेंद्र यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

- Advertisement -

मात्र तिथे उपचार सुरु असतानाच त्यांचा मृत्यू झाला. ही माहिती मिळताच मलबार हिल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. इमारतीमध्ये खिडकी दुरुस्तीचे काम करताना कामगाराच्या सुरक्षेसाठी कॉन्ट्रक्टरने कोणतीही साधने पुरविली नव्हती. त्यातून ही दुर्घटना घडल्याचे तपासात उघडकीस आले आहे. याप्रकरणी जुगुल साहानी यांच्या तक्रारीवरुन पोलिसांनी कॉन्ट्रक्टरविरुद्ध हलगर्जीपणाचा गुन्हा नोंदविला आहे. या गुन्ह्यांत अद्याप त्याला अटक केली नसून चौकशी सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -