घरमुंबईआयुक्तांच्या दालनाबाहेरच कर्मचार्‍याचा हार्टअॅटॅकने मृत्यू

आयुक्तांच्या दालनाबाहेरच कर्मचार्‍याचा हार्टअॅटॅकने मृत्यू

Subscribe

चंद्रकांत विरकर असे या लिपिकाचे नाव असल्याचे बोलले जात आहे. संध्याकाळी ४च्या सुमारास ही घटना घडली. 

मुंबई महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांच्या दालनाबाहेरच शिक्षण विभागाच्या एका लिपिकाला हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने निधन झाले. चंद्रकांत विरकर असे या लिपिकाचे नाव असल्याचे बोलले जात आहे. संध्याकाळी ४च्या सुमारास ही घटना घडली.

अशी घडली घटना

मुंबई महापालिका अनुदानित शाळांच्या विभागातील लिपिक आयुक्तांच्या दालनाबाहेर सोफ्यावर दोन अधिकारी सहकार्‍यांसह बसलेले असतानाच त्यांच्या छातीत अचानक दुखू लागले. आणि अचानक खाली कोसळले. मात्र, त्याचवेळी उपस्थित असलेल्या केईएम रुगणालयातील डॉ. प्रविण बांगरसह अन्य डॉक्टरांनी तात्काळ त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले. त्यांच्या छातीवर दाब देवून पंपिंग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर ते शुद्धीवर आले. या प्राथमिक उपचारानंतर मुख्यालय दवाखान्यातील डॉक्टर तसेच त्यांच्या सहकार्‍यांच्या मदतीने त्यांना तात्काळ जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -