घरताज्या घडामोडीवडाळा पोलीस ठाण्यातील शिपायाचा नाशिकमध्ये मृत्यू!

वडाळा पोलीस ठाण्यातील शिपायाचा नाशिकमध्ये मृत्यू!

Subscribe

वडाळा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या निलेश अण्णासाहेब जोंधळे यांचे नाशिकमध्ये निधन झाले आहे.

वडाळा पोलीस ठाण्यातील निलेश अण्णासाहेब जोंधळे यांचे आज सकाळी निधन झाले. ते वडाळा पोलीस ठाण्यात पोलीस शिपाई म्हणून कार्यरत होते. त्याचा मृत्यू नाशिकमध्ये झाला आहे. निलेश जोंधळे यांचा मृत्यू हा कोरोना या आजाराने झालेला नसल्याचे वडाळा पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस शिपाई निलेश जोंधळे यांना निवडणुकीच्या बंदोबस्तात हार्ट अटॅक आला होता. त्यामुळे त्यांना १ ऑक्टोबरला वाशी येथील महात्मा गांधी रुग्णालयात उपचारकरिता दाखल करण्यात आले होते. त्यानंतर तीन महिने उपचार घेतल्यानंतर ते कोमात गेले होते. पण नंतर त्यांच्या कुटुंबियांना रुग्णालयाचा खर्च परवडत नसल्यामुळे त्यांनी नाशिक येथील रुग्णालयात त्यांना हलवले होते. नाशिक मधील रुग्णालयात उपचार करून झाल्यानंतर एक महिन्यापासून निलेश जोंधळे घरीच होते आणि त्यांचा घरीच मृत्यू झाला.

- Advertisement -

वडाळा परिसरात कोरोनाबाधित रुग्णाचे प्रमाण जास्त असून एकट्या वडाळा पोलीस ठाण्यात २५ पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. यामध्ये चार पोलिस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. मुंबईतून परप्रांतीय मजुरांची मोठ्या प्रमाणात रवानगी होत असून या मजुरांना पाठवण्याची सर्वस्वी जबाबदारी पोलिसांवर येऊन ठेपली आहे. या मजुरांच्या संपर्कात येणार पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण अधिक वाढले असल्याचा आरोप पोलिसांकडून होत आहे.


हेही वाचा – चिंता वाढली! २४ तासात ८७ पोलिसांना कोरोनाची लागण!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -