घरमुंबईमुंबईतील रेल्वे ट्रॅकवर मृत्यूतांडव, ५ वर्षात हजारो बळी

मुंबईतील रेल्वे ट्रॅकवर मृत्यूतांडव, ५ वर्षात हजारो बळी

Subscribe

मुंबईत गेल्या ५ वर्षात रेल्वे रूळ ओलांडताना तसंच रेल्वेतून पडून १८ हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

मुंबईची उपनगरीय लोकल ट्रेन म्हणजे मुंबईची ‘लाइफ लाईन’. दररोज एक कोटीपेक्षा अधिक प्रवासी उपनगरीय रेल्वे गाड्यांतून प्रवास करतात. मात्र, मुंबईच्या लोकलमधील भरमसाट गर्दीमुळे अनेक प्रवासी स्वत:चा जीव धोक्यात घालतात आणि  रेल्वेच्या दरवाजावर लटकून प्रवास करतात. यामुळे दररोज सरासरी १० ते १२ प्रवासी रेल्वे गाड्यांतून पडून आपला जीव गमावतात. याशिवाय रेल्वे ट्रॅक क्रॉस करताना जीव गमावलेल्या लोकांची संख्या वेगळीच. २०१३ पासून ते २०१८ ऑगस्ट या काळात मुंबईत रेल पटरीवर तब्बल १८ हजार ४२३ लोकांनी आपले जीव गमावले आहेत. तर, १८ हजार ८४७ लोक जखमी झाले आहेत. माहितीचा अधिकार अधिनियमांतर्गत ही माहिती प्राप्त झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद शेख यांनी मुंबई रेल्वे पोलीस यांच्याकडे २०१३ पासून मुंबई उपनगरीय रेल्वेगाड्यातून पडून किंवा रेल्वे पटरी क्रॉस करताना मृत्यू झालेल्या तसंच जखमी झालेल्या लोकांची माहिती मागितली होती.

वर्षाकाठी मृत्यू जखमी झालेल्या लोकांची आकडेवारी


2013 – 3,506 लोकांचा मृत्यू तर 3,318 जखमी
2014 – 3,423 लोकांचा मृत्यू तर 3,299 जखमी
2015 – 3,304 लोकांचा मृत्यू तर 3,349 जखमी
2016 – 3,202 लोकांचा मृत्यू तर 3,363 जखमी
2017 – 3,014 लोकांच्या मृत्यू तर 3,345 जखमी
2018 – 1,974 लोकांचा मृत्यू तर 2,173 जखमी (ऑगस्ट महिन्यापर्यंत)


वाचा: धरणग्रस्तांच्या पाठीशी सदैव उभा रहाणार – उद्धव ठाकरे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -