घरमुंबईसर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासंदर्भात आज होणार निर्णय

सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्यासंदर्भात आज होणार निर्णय

Subscribe

आज बुधवारी उच्च न्यायालयात होणार सुनावणी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जवळपास गेल्या १० महिन्यांपासून सर्वसामान्यांसाठी ठप्प असलेली मुंबई लोकल ट्रेन केव्हा सुरू होणार याकडे साऱ्या मुंबईकरांचे लक्ष लागले आहे. सर्वसामान्यांसाठी लवकरात लवकर लोकल प्रवास सुरू व्हावा, यासाठी प्रवासी संघटना, नागरी संघटना व राजकीय पक्षही राज्य सरकारला सूचना करत असून सर्वसामान्यांसाठी लोकल लवकर सुरू करण्याची मागणी करत आहेत. मुंबई लोकल सर्वसामान्य नागरिकांसाठी सुरु करण्याचे राज्य सरकारचे संकेत असताना आज बुधवारी उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. दरम्यान मंगळवारी रेल्वे सुरू करण्याबाबतचे रेल्वे अधिकारी आणि राज्य सरकारचे अधिकारी यांच्यात चर्चा झाली असून आज न्यायालयात सरकारकडून आपली भूमिका मांडण्यात येणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची आज या संदर्भात बैठक होणार असून लोकल बाबत कोणता निर्णय घेतला जातो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे.

आज होणार लोकलचा सुरू करण्याचा निर्णय

अनलॉकच्या प्रक्रियेत ही लोकल टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात आली आहे. सर्वप्रथम अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरु करण्यात आली. त्यानंतर महिलांना देखील ठराविक वेळात लोकलमधून प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, आज उच्च न्यायालयाच्या निर्णयावर सर्वसामान्यांसाठी लोकल सेवा सुरू होणार की अद्याप नाही, हे ठरणार आहे. आणि जर मुंबईची लोकल सर्वसामान्यांसाठी सुरु करायची असेल तर यासाठी चेन्नई पॅटर्न वापरला जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

चेन्नई पॅटर्न म्हणजे…

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चेन्नई उपनगरीय रेल्वेने तीन टप्प्यांत प्रवाशांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली होती. पहिल्या टप्प्यात अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना परवानगी देण्यात आली आहे. दुसऱ्या टप्प्यात विना गर्दीच्या वेळेत महिलांना प्रवास करण्याची मुभा देण्यात आली. तर तिसऱ्या टप्प्यात म्हणजे २३ डिसेंबर २०२० रोजी गर्दी नसलेल्या वेळेत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली. यामध्ये महिलांना पूर्ण वेळ, सामान्य प्रवाशांना गर्दी नसलेली वेळ आणि रात्री १० ते सकाळी ७ पर्यंत सामान्यांचा प्रवास असे तीन पर्याय मुंबई लोकल प्रवासाचे असणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -