घरमुंबईनाखवा रे...जाल्यात मासली गावना

नाखवा रे…जाल्यात मासली गावना

Subscribe

वातावरण बदलामुळे मत्स्यउत्पादनात घट

वारंवार होणार्‍या वातावरणातील बदलामुळे रायगड जिल्ह्यातील मत्स्यउत्पादनात घट झाली आहे. इतर आणि मोठे मासे मिळत नाहीत. फक्त जवळाच मोठ्या प्रमाणात कोळ्यांच्या जाळ्यात मिळत आहे. त्यामुळे कोळी बांधव आर्थिक संकटात सापडले आहेत.

रायगड जिल्ह्यात 240 किमीचा समुद्रकिनारा आहे. जिल्ह्यात 4 हजार 484 नोंदणीकृत बोटी आहेत. 45 ठिकाणी मासळी उतरवली जाते. जिल्हा मत्सव्यावसायात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते, परंतु मागील काही दिवसांमध्ये वातवरणात अचानक वारंवार बदल होत असल्यामुळे पुरेशी मासळी मिळेनाशी झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात कर्ली, सुरमई, कोळंबी, माकूल, ढोमा अशी मासळी दुर्मीळ झाली आहे.

- Advertisement -

समुद्रातील भागांची भरती, अवेळी पडणारा पाऊस, वाढलेली थंडी, वारा तसेच सतत बदलत असलेले वातावरण यामुळे मच्छीमार बांधवांच्या व्यवसायावर विपरित परिणाम होत आहे. जास्त उत्पन्न देणारे मासे मिळेनासे झाले आहेत. केवळ जवळा, मांदेली, कोलंबीच मोठ्या प्रमाणात मिळत आहे. चांगला भाव देणारी मासळी तुरळक प्रमाणात मिळत असल्याने डिझेल खर्च, कामगारांचा खर्च परवडत नसल्याचे मासेमारी करणार्‍यांनी सांगितले.

वातावरणात वारंवार होणार्‍या बदलामुळे मच्छी मिळण्याचे प्रमाण कमी झाले आहे. बदलत्या वातावरणात मासळी खोल समुद्रात जाते. येत्या काही दिवसांत वातावरण स्थिर होईल. त्यानंतर मोठ्या प्रमाणात मासळी मिळेल.
-अभयसिंग इनामदार, सहायक आयुक्त, मत्सविभाग

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -