घरमुंबईनॉनपँट्री रेल्वेमध्येही स्वादिष्ट जेवण

नॉनपँट्री रेल्वेमध्येही स्वादिष्ट जेवण

Subscribe

पँट्री कार नसलेल्या रेल्वे गाड्यातील प्रवाशांना यापुढे जेवणाची आणि नास्त्याची चिंता करावी लागणार नाही. कारण आता आयआरसीटीसीकडून ६३ नॉन पँट्री रेल्वे गाड्यांमध्ये स्वादिष्ट जेवण उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आयआरसीटीसीने ट्रेन साईड केटरिंगसाठी आता निविदासुद्धा मागविल्या आहेत. त्यामुळे आता नॉन पँट्री रेल्वे गाड्यामध्ये प्रवाशांना स्वादिष्ट आणि स्वच्छ जेवणाच्या आस्वाद घेता येणार आहे.

भारतीय रेल्वेकडून 1 हजार 256 लांब पल्याच्या गाड्यांमध्ये कॅटरिंग सुविधा देण्यात आली आहे. या रेल्वे गाड्यांच्या पँट्री कारमधून दररोज १२ लाख प्रवाशांसाठी जेवण तयार करण्यात येते. मात्र ज्या रेल्वे गाड्या 1 हजार किलोमीटरपर्यंत धावतात.

- Advertisement -

अशा 3 42 रेल्वे गाड्यांत अद्यापही पँट्री कार नसल्यामुळे या गाड्यांतील रेल्वे प्रवाशाना जेवण मिळत नाही. परिणामी प्रवाशांना बेकादेशीर खाद्य पदार्थ घ्यावे लागतात. त्यामुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात आर्थिक पिळवणूक होत असते. याला आळा बसण्यासाठी आणि प्रवाशांना स्वादिष्ट आणि स्वच्छ जेवण मिळावे याकरिता रेल्वेने, या अगोदर ई-कॅटरिंग सिस्टम लागू केली आहे. या ई-कॅटरिंग सेवेत इंटरनेट वा फोन करून बाहेरचे पदार्थ मागवता येतात. मात्र याला पाहिजे तितका प्रतिसाद न मिळाल्याने रेल्वे ट्रेन साईड कॅटरिंग सुविधा सुरू करण्यात येत आहे. नुकतीच इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी ) कडून 63 नॉन पेट्री रेल्वे गाड्यात कॅटरिंग सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ट्रेन साईड कॅटरिंगसाठी निविदा मागविल्या आहेत.

यामध्ये मुंबई ते पुणे, पुणे-भुसावळ, मुंबई-गुजरात आणि मुंबई – नाशिक दरम्यान धावणार्‍या रेल्वे गाड्यांचा समावेश आहे. यामध्ये महाराष्ट्र एक्स्प्रेस, सह्याद्री एक्स्प्रेस, मुंबई पुणे इंटरसिटी एक्स्प्रेस नेहमी धावणार्‍या रेल्वे गाड्यांच्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.

- Advertisement -

अशी असणार ट्रेन साईड कॅटरिंग
पँट्री कार नसलेल्या रेल्वे गाड्यांमधील प्रवाशांना आता पँट्रीप्रमाणेच पदार्थांचा आस्वाद घेणे ट्रेन साईड कॅटरिंगमुळे शक्य होईल. रेल्वेतील खाद्यपदार्थांना खासगी पर्याय मिळाल्यास स्पर्धा वाढून प्रवाशांना त्याचा मोठा फायदा होईल. या प्रत्येक ट्रेन साईड कॅटरिंगवाल्यांना खाद्य पदार्थांचे बॉक्स बाळगावे लागणार आहेत. त्यांची विक्री रेल्वे गाड्यांमध्येच करावी लागणार आहे. सोबतच त्यांना एक ठराविक क्षेत्र दिले जाईल. त्यांना त्यांच्या परिसरात रेल्वे गाड्यांमध्ये सुविधा देणे शक्य आहे. त्यांना क्षेत्राबाहेर व्यवसाय करता येणार नाही, अशी माहिती इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टूरिझम कॉर्पोरेशनच्या एका वरिष्ठ अधिकार्‍याने ‘आपलं महानगर’ला दिली.

Nitin Binekar
Nitin Binekarhttps://www.mymahanagar.com/author/bnitin/
गेल्या ५ वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सार्वजनिक वाहतूक, शैक्षणिक विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -