घरमुंबईआदित्य ठाकरे यांच्या नावाने डिलिव्हरी बॉयचा 'मातोश्री'च्या कर्मचाऱ्यांना गंडा

आदित्य ठाकरे यांच्या नावाने डिलिव्हरी बॉयचा ‘मातोश्री’च्या कर्मचाऱ्यांना गंडा

Subscribe

ऑनलाईन ऑर्डर न केलेल्या वस्तू खपवण्याचा प्रयत्न डिलिव्हरी बॉयने थेट 'मातोश्री'वर जाऊन केला. याबाबत त्याने चार वेळा मातोश्रीच्या कर्मचाऱ्यांना फसवले. मात्र, पाचव्यांदा त्याची चोरी पकडली गेली.

एका मोठ्या ऑनलाईन शॉपिंग कंपनीत काम करणाऱ्या एका डिलिव्हरी बॉयने युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे नाव सांगून ‘मातोश्री’च्या कर्मचाऱ्यांना गंडा घातला आहे. धीरेन मोरे (२०) असे या तरुणाचे नाव आहे. धीरेनने तब्बल चार वेळा आदित्य ठाकरे यांनी ऑर्डर न केलेल्या वस्तू मातोश्रीवर पोहोचवल्या. कमी किमतीच्या वस्तू देऊन त्याने जास्त पैसे उकळले. गुरुवारी देखील तो अशाचप्रकारे ऑर्डर न केलेल्या वस्तूची डिलिव्हरी करायला मातोश्रीवर गेला. मात्र, त्यावेळी आदित्य ठाकरे घरी होते. यावेळी ‘मातोश्री’च्या कर्मचाऱ्यांनी आदित्य ठाकरेंना ऑर्डर आल्याची माहिती दिली. मात्र, आदित्य ठाकरे यांनी आपण कोणतीही ऑर्डर मागवली नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे धीरेनची चोरी पकडली गेली. मात्र, धीरेनला या गोष्टीची चुनूक लागताच त्याने पळ ठोकला.

खेरवाडी पोलिसांनी डिलिव्हरी बॉयला केले अटक

धीरेन कमी किंमतीच्या वस्तू पॅक करुन ग्राहकांची फसवणूक करायचा. तो ग्राहकांकडून जास्त पैसे उकळायचा. त्याची हिंमत इतकी त्याने थेट ‘मातोश्री’च्या कर्मचाऱ्यांना चार वेळा गंडा घातला. मात्र, पाचव्यांदा तो पकडला गेला. आदित्य ठाकरे गुरुवारी घरी असल्यामुळे हा सगळा प्रकार उघडकीस आला. धीरेनने पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘मातोश्री’च्या कर्मचाऱ्यांनी त्याला शोधून काढले. ‘मातोश्री’च्या सुरक्षा रक्षकांनी त्याला खेरवाडी पोलिसांच्या स्वाधीन केले आणि पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – उदयनराजे भोसले यांचा भाजपात प्रवेश

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -