घरमुंबईलोकशाहीतील सहभागासाठी ‘लोकतंत्र’

लोकशाहीतील सहभागासाठी ‘लोकतंत्र’

Subscribe

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्यांदाच मतदान करणार्‍या नवमतदारांना निवडणूक प्रक्रियेची माहिती देणे, अधिकाधिक तरूणाईने लोकशाही प्रक्रियेत सहभागी व्हावे, यासाठी हा प्रयत्न आहे. लोकसभा निवडणुकीत उमेदवारांची सविस्तर माहिती लोकतंत्रच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहे. उमेदवार निवडण्यास मदत करणार्‍या ‘लोकतंत्र’ मोबाईल अ‍ॅप्लिकेशन, वेब पोर्टलचे शनिवारी मुंबईत मुंबई मराठी पत्रकार संघात अनावरण करण्यात आले.

राजकीय पक्षांच्या उमेदवारांच्या नावे किती गुन्हे आहेत, यासारखी महत्वपूर्ण माहिती आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसारमाध्यमांमध्ये जाहीर करणे आता बंधनकारक आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने तसा तपशील जाहीर करण्याचे स्पष्ट केले आहे. लोकतंत्रसारखा पर्याय हा निवडणूक प्रक्रियेत अधिक पारदर्शकता आणण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी व्यक्त केले. मुंबई, ठाणे आणि दिल्ली यासारख्या मोठ्या शहरांमधील नवमतदारांसाठी हा पर्याय नक्कीच उपयुक्त ठरेल.‘लोकतंत्र’च्या निमित्ताने काही तरी नवीन घडत असल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

संपूर्ण निष्पक्ष अशी तरूणाई असणार्‍या लोकतंत्रच्या टीमने हा पर्याय ग्रामीण भागातील मतदारांना द्यावा, अशी मागणी यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केली. पारदर्शक पद्धतीने काम करणार्‍या तरूणांची आमचे नेतृत्व राहुल गांधी यांना गरज आहे. त्यामुळे लोकतंत्रच्या टीमने काँग्रेसचे सदस्यत्व घ्यावे, असे आवाहनही तांबे यांनी केले. यंदा २१ व्या शतकातील नवमतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहेत. देशाचे नेतृत्व योग्य उमेदवारांच्या हाती असावे, तसेच सत्तेत योग्य उमेदवार निवडून यावेत यासाठी लोकतंत्र हा पर्याय उपलब्ध झाला आहे, असे मत भाजप नेते मोहित भारतीय यांनी केले. भारतात तनिषा सारख्या बिगर राजकीय तरुणीने राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी ही वेबसाईट सुरु केली, याबद्दल तिच्या टीमचे अभिनंदन केले.

मतदानाबद्दल माहितीच्या अभावी तरुणांना मतदार होण्यासाठी नोंदणी कुठे करायची? आपला मतदारसंघ कोणता? मतदारसंघातील उमेदवार कोण? किंवा कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे, असे अनेक प्रश्न पडतात, असे मत लोकतंत्र अ‍ॅपच्या मुख्य संपादक आणि सीईओ तनिषा अवर्सेकर यांनी मांडले. यावेळी भाजपचे आमदार प्रसाद लाड, माजी शेरीफ जगन्नाथ हेगडे उपस्थित होते.

- Advertisement -

पण आतापर्यंतच्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान अनेकदा मतदार ईव्हीएम मशीनवर जाऊन मतदानाचा पर्याय निवडतात, अशा बाबी लोकशाहीस धोकादायक आहेत असे ते म्हणाले. त्यामुळेच लोकतंत्र उमेदवाराची योग्य माहिती देण्यासाठी उपयुक्त ठरेल असे जयंत पाटील त्यांनी सांगितले.

देशाचे नेतृत्व योग्य उमेदवारांच्या हाती असावे, तसेच सत्तेत योग्य उमेदवार निवडून यावेत यासाठी लोकतंत्र हा पर्याय उपलब्ध झाला आहे, असे मत भाजप युवा मोर्च्याचे अध्यक्ष मोहित भारतीय यांनी मांडले. अशा व्यासपीठामुळे उमेदवारांना आणि मतदारांना एकमेकांशी संवाद साधण्यासाठी मदत होणार आहे. अमेरिकेत मिशेल ओबामा यांनी मताची ताकद काय असते? हे सांगणारी एक मोहीम सुरू केली होती. भारतात तनिषा सारख्या बिगर राजकीय तरुणीने राजकारणात पारदर्शकता आणण्यासाठी ही वेबसाईट सुरु केली, याबद्दल तिच्या टीमचे अभिनंदन. मेट्रो शहरांसाठी हे एक चागंले पाऊल आहे. मागच्या ६० वर्षांपासून आपला देश जातीवाद, भाषावाद, प्रांतवाद यात अडकून चांगल्या उमेदवाराला डावलत आला आहे, अशी भूमिका मोहित भारतीय यांनी व्यक्त केली.

तरुणांमधील उदासिनता दूर करून जास्तीतजास्त तरुणांना मतदानासाठी प्रवृत्त करणे ही लोकशाहीची गरज आहे. मात्र मतदानाबद्दल माहितीच्या अभावी तरुणांना मतदार होण्यासाठी नोंदणी कुठे करायची? आपला मतदारसंघ कोणता? मतदारसंघातील उमेदवार कोण आहेत? किंवा कोणत्या उमेदवाराला मतदान करायचे, असे अनेक प्रश्न पडतात, असे मत लोकतंत्र अ‍ॅपच्या मुख्य संपादक आणि सीईओ तनिषा अवर्सेकर यांनी मांडले. सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला सहज, सुलभ आणि त्वरीत उपलब्ध होणार आहेत. लोकंतत्रवर एका क्लिकसह ही उत्तरे मिळतील. तनिषा अवर्सेकर यांच्या संकल्पनेतून लोकतंत्र ही वेबसाईट तयार झाली आहे.

लोकतंत्र या मोबाईल अ‍ॅप्लिकेशन आणि वेबसाईटच्या माध्यमातून मतदारांना शासन आणि राज्यकर्ते यांच्यातील माहितीच्या देवाणघेवाणीसाठी एक उत्तम पर्याय मिळणार आहे. अ‍ॅप्लिकेशनच्या माध्यमातून लोकप्रतिनिधींशी थेट संपर्क साधता येईल. मुंबईचे प्रश्न मांडणारा योग्य खासदार केंद्रात निवडून जावा, यासाठी लोकतंत्रच्या टीमची मेहनत खरच चमकदार अशी आहे. मुंबईचा आवाज बनणार्‍या आणि मुंबईच्या विकासाच्या दृष्टीने काम करणार्‍या लोकतंत्रच्या टीमच्या तनिषा अवर्सेकर यांना आम्ही पदाधिकारी बनवतो, असे वक्तव्य मोहित भारतीय यांनी यावेळी केले.

हे आहेत फीचर्स 

लोकतंत्र अ‍ॅप्लिकेशन आणि वेबसाईटच्या माध्यमातून मतदारांना मतदान प्रक्रियेची

संपूर्ण माहिती मिळणार आहे. आपल्या लोकसभा तसेच विधानसभा मतदारसंघांनुसार आपले नाव नेमके कोणत्या मतदारयादीत समाविष्ट आहे याबाबतची माहिती मिळू शकेल. तुमच्या नावानुसार कुठे आणि कधी मतदान करायचे याबाबतच माहिती मिळू शकेल. उमेदवाराची माहिती, व्हिडिओ, लेख आदी माहिती मिळेल. मुलाखत, सर्वेक्षण, उमेदवारांची सविस्तर माहिती तसेच प्रश्नावली यासारख्या गोष्टींचा समावेशही वेबसाईटवर आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -