घरमुंबईसदानंद महाराज वाचवण्यासाठी भाविकांचे शक्तीप्रदर्शन

सदानंद महाराज वाचवण्यासाठी भाविकांचे शक्तीप्रदर्शन

Subscribe

तुंगारेश्वर पर्वतावर असलेल्या बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रमावर कारवाई होऊ नये यासाठी भक्तांनी मुंबई-अहमदाबाद हायवेवरील शिरसाट फाटा येथे शक्तीप्रदर्शन केले. महामेळावा भरवून भक्तांनी सदानंद महाराजांना आपला पाठिंबा दिला.

तुंगारेश्वर पर्वतावर बालयोगी सदानंद महाराज यांच्या आश्रम 1971 साली बांधण्यात आला आहे. त्यासाठी राज्य सरकारने 70 गुंठे जागा दिलेली आहे. मात्र, पर्यावरणवादी कार्यकर्ते देबी गोयंका यांच्या कन्झर्वेशन अ‍ॅक्शन ट्रस्टने आश्रमाविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. कोर्टाने आश्रम बेकायदा ठरवत येथील बांधकामांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे कोकणातील सदानंद महाराजांचा आगरी, कोळी समाजातील भक्तांमध्ये नाराजी पसरली आहे.

- Advertisement -

आश्रम वाचवण्यासाठी आश्रम बचाव समितीची स्थापना करण्यात आली असून समितीने जनजागृती सभा, सह्यांची मोहिम, राजकीय नेत्यांशी संपर्क अशा विविध माध्यमातून आश्रमावर कारवाई होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू ठेवले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून समितीने शिरसाट फाटा येथे महामेळाव्याचे आयोजन केले होते.

यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार राजेंद्र गावित, आगरी सेनेचे उपाध्यक्ष कैलास पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, आमदार नरेंद्र मेहता, आमदार बाळासाहेब मुरकुटे, डॉ. विश्वास वळवी यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते. आगरी सेनेचे कैलास पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या आश्रमावर कारवाई होऊ नये साठी राज्य सरकारने योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -