घरमुंबईकळंबोलीमध्ये डेंग्यू, मलेरियाचे थैमान

कळंबोलीमध्ये डेंग्यू, मलेरियाचे थैमान

Subscribe

महानगरपालिकेची यंत्रणा तोकडी,दीड लाख लोकसंख्येसाठी 5 कर्मचारी

कळंबोली वसाहतीतील सेक्टर 2 इ आणि 3 इ परिसरातील एबीसीडी ग्रुपमध्ये दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांना डेंग्यू, मलेरिया सारख्या साथीच्या रोगांना सामोरे जावे लागत आहे. कळंबोलीमध्ये डेंग्यूच्या आजाराने थैमान घातले असून यात एका महिलेला आपले प्राणही गमवावा लागला, तर 21 जणांना डेंग्यू झाला असून हे रुग्ण खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

या परिसरात अतिशय दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार नगरसेवक गोपाळ भगत यांनी पाणीपुरवठा विभाग सिडको बेलापूर यांच्याकडे लेखी निवेदनाने केली आहे. या परिसरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ व दूषित पाणीपुरवठा सुरू आहे. ठिकठिकाणी सेवरेज लाईन लिकेज आहेत तर काही ठिकाणी या लाईन तुंबल्याने पंप लावून ते पाणी पुढच्या चेंबरमध्ये सोडले जात आहे. एवढी भयानक परिस्थिती कळंबोली वसाहतीत पहायला मिळत आहे. परिणामी सिडकोच्या नळाला दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे सुरुवातीला पाणी भरलेले पाच ते सहा हंडे ओतून द्यावे लागत आहेत.

- Advertisement -

त्यातच कळंबोली परिसरात डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. डेंग्यूने प्रतिभा देवरे या महिलेचा मृत्यू झाला असून तिच्या मुलालाही डेंग्यू झाल्याने त्याच्यावर वाशी येथे उपचार चालू आहेत. तसेच के एल 5 बिल्डींग नं 33/ 5 मधील प्रभाकर जाधव, सुनित जाधव, प्रणय जाधव व प्रज्ञा जाधव या चारही जणाना डेंग्यू झाला असून त्यांच्यावर अष्टविनायक हाँस्पिटल खांदा काँलनी येथे उपचार होत आहेत.

कळंबोली वसाहतीतील दीड लाख लोकसंख्येसाठी फक्त पाच कर्मचारी एमपीडब्लू काम करत आहेत. त्यात सर्व महिला कर्मचारी असल्याने कधी रात्रीच्या वेळेतही या महिला कर्मचार्‍यांना डेंग्यू किंवा मलेरियाच्या तपासणीसाठी जावे लागत आहे. त्यामुळे त्यांच्यावरही कामाचा ताण आहे. तसेच या कर्मचार्‍यांना उशिराने होणार्‍या तुटपुंज्या पगारावरच काम करावे लागत असल्याचेही चित्र आहे. दूषित पाण्याविषयी सिडकोचे पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंत्यांनी सांगितले की ‘कुठेतरी पाणी दूषित होत असेल व त्यामुळे अशी समस्या असू शकते. पाहणी करून त्यावर उपाययोजना करण्यात येतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -