मीरा रोडमध्ये घरात आढळला मायलेकाचा मृतदेह

mira road dead bodies
घरामध्ये मायलेकाचा मृतदेह

मीरा रोड येथे एका घरामध्ये महिला आणि पुरुषाचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. हा मृतदेह आई आणि मुलाचा असल्याचे समजते. ७२ वर्षिय महिला आणि ४२ वर्षिय मुलगा यांचा मृतदेह बेडवर आढळला. तणावामुळे या दोघांची आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यांना घरातून विष सापडल्याचे तपास करणाऱ्या स्थानिक पोलिसांनी सांगितले.