घरमुंबईनिर्बंध असूनही मुंबईची हवा अशुद्धच

निर्बंध असूनही मुंबईची हवा अशुद्धच

Subscribe

प्रदूषणाची पातळी मध्यम स्थितीत उष्णता प्रदूषण नियंत्रित करण्यात मदतगार

कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर दिवाळी दरम्यान मुंबईची हवा स्वच्छ ठेवण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न अपुरे ठरले आहेत. दिवाळीच्या रात्री आणि दुसर्‍या दिवशी मुंबईत प्रदुषण मध्य पातळीवर होते. दिवाळीच्या रात्री मुंबईचा एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) १११ झाला आहे, तर रविवारी दुपारपर्यंत AQI पातळी ११५ वर पोहोचली आहे. हवेच्या गुणवत्तेवर लक्ष ठेवणारी सिस्टम ऑफ एअर क्वालिटी अँड फॉरकास्टिंग अँड रिसर्च अनुसार, चेंबूरची हवा रविवारी सर्वाधिक प्रदूषित झाली. चेंबूरची AQI २५६ नोंदली गेली. चेंबूरनंतर वरळीत सर्वाधिक प्रदूषित हवा वरळीत AQI १७४, बीकेसीमध्ये AQI १६४ आणि अंधेरीमध्ये AQI १४० राहिली. दिवाळीच्या वेळी फटाक्यांपासून होणारे वायू प्रदूषण रोखण्यासाठी प्रशासनाने फटाक्यांवर काही निर्बंध घातले आहेत. निर्बंध असूनही शनिवारी रात्री बर्‍याच लोकांनी नियमांचे उल्लंघन केले. सफरचे संचालक गुफरान बेग यांच्या म्हणण्यानुसार, २०१९ चा डेटा वगळल्यास मागील चार वर्षाच्या तुलनेत यंदा मुंबईची हवा सर्वात कमी प्रदूषित झाली आहे. मुंबईत प्रदूषणाची पातळी मध्यम राहिली. २०१९ मध्ये पावसामुळे प्रदूषणाची पातळी कमी होती.

वाढते तापमान ठरले फायदेशीर

वाढत्या उष्णतेमुळे मुंबईतील प्रदूषणाची पातळी खराब होण्यापासून फायदेशीर ठरली आहे. स्कायमेट व्हॉईसचे अध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले की, थंड हवा जोरदार आहे, थंड हवा जडपणामुळे जमिनीजवळच राहते, तर उबदार हवा हलकी आहे आणि वेगाने वरती जाते. १४ नोव्हेंबरला उष्णतेमुळे प्रदूषित हवा वर गेली. यामुळे प्रदूषणाची पातळी नियंत्रित राहिली. गेल्या काही दिवसांपासून मुंबईचे किमान तापमान निरंतर कमी होत होते. किमान तापमान १९ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले होते, परंतु दिवाळीच्या दिवशी तापमानात वाढ झाली होती आणि किमान तापमान २३.५ डिग्री सेल्सियसपर्यंत पोहोचले होते.

- Advertisement -

हवा गुणवत्ता मोजमाप

० ते ५० एक्यूआय – चांगले
५१ ते १०० एक्यूआय – ठीक आहे
१०१ ते २०० एक्यूआय – मध्यम
२०१ ते ३०० एक्यूआय – खराब
३०१ ते ४०० एक्यूआय – अत्यंत वाईट
४०० च्या वर – गंभीर

कुठे किती एक्यूआय

चेंबूर – २५६
कुलाबा – १४९
अंधेरी – १४०
माझगाव – ७६
वरळी – १७४
बोरिवली – ११४
बीकेसी – १६४
मालाड – १०८
भांडुप – १०१

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -