घरताज्या घडामोडीदेवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना जाहीर आव्हान!

देवेंद्र फडणवीसांचं शरद पवारांना जाहीर आव्हान!

Subscribe

देवेंद्र फडणवीस यांनी सीएएच्या मुद्द्यावर थेट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाच आव्हान दिलं आहे.

राज्यात महाविकासआघाडीचं सरकार आल्यापासून सत्ताधाऱ्यांच्या विरोधात रणशिंग फुंकणारे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी मुंबईत झालेल्या भाजपच्या राज्यस्तरीय अधिवेशनात शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारवर जोरदार टीका केली. आगामी नवी मुंबई महानगर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत झालेल्या या अधिवेशनात भाजपकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं. यावेळी शिवसेनेसोबतच देवेंद्र फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील टीका करत त्यांना जाहीर आव्हानच दिलं. ‘काही लोक जाणून-बुजून सीएए, एनआरसीबद्दल संभ्रम पसरवत आहेत. खुद्द पं. जवाहरलाल नेहरू, लालबहादूर शास्त्रींनीच अशा स्वरूपाची मागणी केली होती. आता सत्तेसाठी काही नेते खोटं बोलत आहेत. सीएएमुळे भटक्या-विमुक्तांना नक्की कसा त्रास होणार आहे? हे पवारांनी सिद्ध करूनच दाखवावं’, असं जाहीर आव्हान फडणवीसांनी यावेळी शरद पवारांना केलं.

‘हिंमत असेल तर पुन्हा निवडणुका घ्या’

दरम्यान, यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला. ‘सध्या राज्यात बसलेलं सरकार पाडण्याची आम्हाला आवश्यकता नाही. ते तसंही पडेल. पण जर तुमच्यात हिंमत असेल, तर पुन्हा निवडणुका घेऊन जनतेला सामोरे जाऊन दाखवा’, असं फडणवीस यावेळी म्हणाले. ‘सरकार पाडून दाखवा’, असं आव्हान उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना आणि भाजपला केलं होतं. त्याला फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलं. ‘आता रडण्याचे नाही, तर लढण्याचे दिवस आहेत. आम्ही शिवाजी महाराजांचे मावळे असून २२ किल्ले दिले, तर ४४ किल्ले परत घेण्याची देखील आमची ताकद आहे’, असं देखील फडणवीस यावेळी म्हणाले.

एक प्रतिक्रिया

  1. सरकार पडो अथवा राहो आपले विरोधी पक्षा चे काम करत राहा बस हीच जनतेची मागणी आहे बाकी येणारी वेळच सगळ्यांनाच उत्तर देणार आहे

टिप्पण्या बंद आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -