घरताज्या घडामोडीतुम्हाला हवी त्याला सुरक्षा द्या, आम्हाला फरक पडत नाही - फडणवीस

तुम्हाला हवी त्याला सुरक्षा द्या, आम्हाला फरक पडत नाही – फडणवीस

Subscribe

राज्यातील काही भाजप नेत्यांची सुरक्षा काढण्यात आल्यानंतर त्यावरून राजकारण सुरू झालं होतं. याबाबतीत भाजपकडून काही नेत्यांनी आक्षेप घेतल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडून संजय राऊत यांनी देखील भाजपवर निशाणा साधला होता. या प्रकारावर आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भूमिका स्पष्ट केली आहे. ‘वरून द्या, खालून द्या, याला द्या, त्याला द्या.. तुमच्या मनात असेल, त्याला सुरक्षा द्या. सुरक्षा काढणं, ठेवणं यामुळे आमच्यावर काहीही फरक पडत नाही. आमची आहे ती सुरक्षाही ठेवली नाही तरी अडचण नाही. मी प्रदेशाध्यक्ष असताना एकही गार्ड माझ्याकडे नव्हता. आजही, मला एकही गार्ड दिला नाही, तरी मी महाराष्ट्रभर फिरू शकतो. चंद्रकांत पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे काढलेले गार्ड महिलांच्या सुरक्षेकडे वळवा. सरकारने अशा गोष्टींपेक्षा भंडाऱ्यासारख्या घटनांकडे लक्ष द्यावं’, असं ते म्हणाले.

जनतेला ही नौटंकी समजते!

दरम्यान, शिवसेनेने घेतलेला गुजराती समाज मेळाव्यावर देखील देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी टीका केली. ‘निवडणुकीच्या व्यतिरिक्तही शिवसेनेने गुजराती समाजाशी संवाद ठेवला, तर तेही आपले नागरिक आहेत. बुलेट ट्रेनला शिवसेना विरोध करते आणि गुजराती समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करत आहे. अशा कार्यक्रमांमुळे लोकं जवळ येत नाहीत, तर तुमच्या कृतीमुळे येत असतात. ही सगळी शिवसेनेची निवडणुकीच्या निमित्ताने नौटंकी सुरू आहे. जनतेला देखील ही नौटंकी समजते’, असं ते म्हणाले.


हेही वाचा – ‘ED समोरच जोड्याने मारलं नाही, तर माझं नाव संजय राऊत नाही!’
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -