दहशतवादी कसाबला ओळखणाऱ्या देवकीला हवीये आर्थिक मदत

काँग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकींकडून मदतीचा हात

devika who identifies terrorist kasab at the age of nine is going through difficult circumstances

मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी अजमल कसाबची न्यायालयात ओळख पटवणारी देविका रोटावन सध्या आर्थिक संकटात सापडली आहे. पायाला गोळ्या लागलेल्या असताना देखील तिने कसाबला ओळखला होतं. मात्र, सध्या तिला आर्थिक मदतीची गरज आहे. कॉंग्रेसचे आमदार झीशान सिद्दीकी यांनी सोमवारी ही माहिती दिली. झीशान सिद्दीकी यांनी सोमवारी तिची घरी जाऊन भेट घेतली. यावेळी त्यांनी तिला आर्थिक मदत केली. शिवाय, तिला खास कोट्या अंतर्गत घर देण्यात यावं, यासाठी मुख्यमंत्र्यांकडे विनंती केली आहे.

२६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात देविकाच्या पायला गोळी लागली होती. त्यावेळी ती ९ वर्षांची होती. दरम्यान, देविकाला आर्थिक मदतीची गरज असल्याचं समजताच झीशान सिद्दीकी यांनी तिची भेट घेतली. तिच्या कथेने प्रेरण मिळाली. तिच्या शौर्यासाठी त्यांना राज्य सरकारने बक्षीस द्यावं, यासाठी मुख्यमंत्र्यांशई बोलणार असल्याचं सांगतिलं आहे. झीशान सिद्दीकी यांनी ट्विट केलं आहे की, “देविका रोटावनला भेटलो. २६/११ च्या हल्ल्यातील दहशतवादी कसाबला न्यायालयात ओळखलं तेव्हा ही धाडसी मुलगी ९ वर्षांची होती. तिने मला गोळीची जखम दाखविली आणि मी तिची प्रेरणादायक कहाणी ऐकली. जेव्हा मला त्याच्या आर्थिक स्थितीबद्दल कळालं तेव्हा मी वांद्रे पूर्व येथील तिच्या घरी जाऊन तिला धनादेश दिला.”

दुसर्‍या ट्विटमध्ये झीशान यांनी लिहिलं आहे की, “मी आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती करतो की या शूर देविकाला खास कोट्यातर्गत मुंबईत घर दिलं जावे. मी यासाठी एक पत्र लिहणार आहे. तिच्या शौर्यासाठी आपण तिला पुरस्कार दिला पाहिजे.”