हिरे व्यापारी हत्या: ‘गोपी बहू’ देवोलिना आणि सचिन पवार मित्र

हिरे व्यापारी उदानी यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी प्रकाश मेहता यांच्या पीएला ताब्यात घेतले आहे. याच प्रकरणात अभिनेत्री देवोलिनी भट्टाचार्जीचेही नाव जोडले गेले. देवोलिनी आणि सचितन पवार एकमेकांचे मित्र आहेत.

Mumbai
Devoleena Bhattacharjee link with ghatkopar murder case
गोपी बहू मालिकेतील संस्कारी सून देवोलिना भट्टाचार्जी आणि सचिन पवार एकमेकांचे मित्र आहेत.

नवी मुंबईच्या पनवेल भागात मुंबईच्या एका हिरे व्यापाऱ्याचा मृतदेह सापडल्याने या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. हा व्यापारी २८ नोव्हेंबरपासून बेपत्ता होता. मुंबईच्या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेवर या व्यापाऱ्याची कार पोलिसांना सापडली होती. कॉल डिटेल्स पडताळून पाहिल्यानंतर पोलिसांसमोर वेगवेगळी माहिती उघड होताना दिसत आहे. या व्यापाऱ्याच्या कॉल डिटेल्समधून तो बार गर्ल्स आणि टीव्ही सीरियलमध्ये काम करणाऱ्या अनेक अभिनेत्रींशी संपर्कात असल्याचे उघड होत आहे. याच संदर्भात पोलिसांनी छोट्या पडद्यावरील ‘गोपी बहू’ या मालिकेतील अभिनेत्रीसहीत गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या स्वीय सहाय्यक सचिन पवारचीही चौकशी करण्यात येत आहे.

घाटकोपर येथील सोन्याच्या व्यापार्‍याचे अपहरण करुन हत्या

पोलिसांच्या माहितीनुसार, घाटकोपर भागात राहणारा राजेश्वर हा हिरे व्यापारी आहे. काल ‘काही वेळातच परत येतो’ असं सांगून तो घराबाहेर पडला होता. परंतु दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत तो परतला नाही. त्यानंतर कुटुंबीयांनी मुंबईच्या पंतनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली होती. या संदर्भात पोलिसांनी या भागातील सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतले आहे. राजेश्वर दुसऱ्याच एका गाडीतून नवी मुंबईच्या दिशेनं जाताना या फुटेजमधून दिसत आहे.

सचिन पवार आणि देवोलिना हे दोघेही मित्र असून काही दिवसांपूर्वी देवोलिनाने त्यांचा फोटो इन्स्टावर अपलोड केला होता.

७ डिसेंबर रोजी नवी मुंबीच्या पनवेल भागातील झाडाझुडपांत एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह सापडला होता. परंतु, त्याची ओळख पटवणे कठिण होते. राजेश्वर यांचे कपडे आणि बूटांची ओळख पटवल्यानंतर हा मृतदेहाची ओळख पटली. यानंतर पोलिसांनी राजेश्वर यांचे कॉल डिटेल्स काढले. यामध्ये मुंबई, नवी मुंबई आणि रायगडच्या अनेक बार गर्ल्सच्या नावांचा समावेश आहे.

यामध्ये एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीच्या नावाचाही समावेश होता. ‘गोपी बहू’ या मालिकेत काम करणाऱ्या एका अभिनेत्रीचे  नाव या कॉल डिटेल्समधून समोर आले आहे. एसीपी मान सिंह पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी आत्तापर्यंत जवळपास २० जणांचा जबाब नोंदवला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here